रविवारी (४ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होऊन १५ दिवस झाले. पंधराव्या दिवशी आयपीएलचे २ सामने झाले. पहिला सामना दुपारी मुंबई इंडयिन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात मुंबईने हैदराबादला ३४ धावांनी पराभूत केले. त्यानंतर रात्री किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये दूसरा सामना झाला. या सामन्यात चेन्नईने १० विकेट्सने एकहाती विजय मिळवला.
या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत (पाँईन्ट टेबल) काही बदल पाहायला मिळाले आहेत. हैदराबादविरुद्धचा सामना जिंकत मुंबईने या हंगामात खेळलेल्या ५ सामन्यांतील तिसरा विजय मिळवला. त्यामुळे त्यांना एकूण ६ गुण मिळाले आहेत आणि संघ +१.२१४ नेट रन रेटसोबत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाब चेन्नईविरुद्ध पराभूत झाल्यामुळे त्यांनी थेट शेवटचा क्रमांक गाठला आहे. पंजाबने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत, त्यातील केवळ १ सामना जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट +०.१७८ इतका झाला आहे.
तसेच दिल्ली कॅपिटल्स (४ सामने ३ विजय, +०.५८८ नेट रन रेट) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (४ सामने ३ विजय, -०.९५४ नेट रन रेट) ६ गुणांसह अनुक्रमे दूसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स (४ सामने २ विजय, -०.१२१ नेट रन रेट) चौथ्या, राजस्थान रॉयल्स (४ सामने २ विजय, -०.३१७ नेट रन रेट) पाचव्या, चेन्नई सुपर किंग्स (५ सामने २ विजय, -०.३४२ नेट रन रेट) सहाव्या आणि सनरायझर्स हैदराबाद (५ सामने २ विजय, -०.४१७ नेट रन रेट) सातव्या क्रमांकावर आला आहे.
सोमवारी (५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील आयपीएल २०२०च्या १९व्या सामन्यानंतर गुणतालिकेत अजून बदल होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबादला बसला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर
अरर… आता कसं व्हायचं!, बेंगलोरच्या धुरंधरला रडवणारा दिल्लीचा गोलंदाज संघाबाहेर, पाहा काय आहे कारण
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ ३ मोठे विक्रम असतील विराट कोहलीच्या निशाण्यावर
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा
‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान