आयपीएलच्या ११ व्या मोसमात आज चौथा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला आज रात्री ८ वाजता सुरुवात होईल.
या दोन्ही संघांना नुकतेच गाजलेले चेंडू छेडछाड प्रकरणामुळे आपले कर्णधार बदलावे लागले आहेत. चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी ठरलेला स्टीव्ह स्मिथ राजस्थानचा तर डेव्हिड वॉर्नर हैद्राबादचा कर्णधार होता. पण त्यांच्यावर घातलेल्या बंदीमुळे यावर्षी राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य राहणे तर हैद्राबादच नेतृत्व केन विल्यम्सन करेल.
याचमुळे या नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे संघ कशी कामगिरी करतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर दोन वर्षांच्या बंदीनंतर राजस्थान आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे हा संघ विजयाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तसेच यावर्षी सर्वात महागडे ठरलेले बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकट हे दोन्ही खेळाडू राजस्थान संघात आहेत.
स्टोक्सची मागीलवर्षी आयपीएलमध्ये उत्तम झाली होती. त्यामुळे तो यावर्षीही तशीच कामगिरी करण्यास उत्सुक असेल. याबरोबरच हैद्राबादकडे शिखर धवन, विल्यम्सन, मनीष पांडे, युसूफ पठाण, कार्लोस ब्रेथवेट असे आक्रमक फलंदाजही आहे. तर भुवनेश्वर कुमार, रशीद खान हे गोलंदाजही आहेत.
त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा चौथा सामना आज, ९ एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना?
सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियम, हैद्राबाद येथे होईल. तसेच या मैदानावर हैदराबादचे सर्व घरचे सामने होणार आहेत.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
सनरायझर्स हैद्राबाद: भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण, कार्लोस ब्रेथवेट, मनीष पांडे, केन विल्यम्सन(कर्णधार), शाकिब अल हसन, शिखर धवन, वृद्धिमान सहा, रशीद खान, रिक्की भुई, दीपक हुडा,सिद्धार्थ कौल, बॅसिल थंपी, सईद अल अहमद, टी नटराजन, सचिन बेबी, तन्मय अग्रवाल, श्रीवत्स गोस्वामी, संदीप शर्मा, बिल्ली स्टॅन्लेक, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन, बिपुल शर्मा, सईद मेहदी हसन
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे (कर्णधार), बेन स्टोक्स,स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर,प्रशांत चोप्रा , कृष्णप्पा गॉथम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अनुरीत सिंग, झहीर खान पेक्टीन , बेन लाफ्लिन, दुशमंथा चामीरा , अंकित शर्मा, अर्यमान बिर्ला , श्रेयश गोपाळ, सुधेसन मिधून, महिपाल लोमरोर, जतीन सक्सेना,