Paris Olympic 2024 :– जागतिक खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या ऑलिंपिक खेळांना 26 जुलैपासून सुरुवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे 27 जुलै ते 11 ऑगस्ट यादरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धा सुरू होऊन 24 तासांचा काळही लोटला नसताना, स्पर्धेतून डोपिंगचे (Doping Test) पहिले प्रकरण समोर आले आहे. तात्काळ प्रभावाने दोषी खेळाडूला निलंबित केले गेले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डोपिंगच्या पहिल्या प्रकरणात, इराकचा पुरुष जुडोपटू दोन प्रतिबंधित पदार्थांच्या (ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स) सेवन केल्याप्रकरणी पॉझिटिव्ह आढळला आहे. आंतरराष्ट्रीय तपास एजन्सी (आयटीए) ने शुक्रवारी सांगितले की, 28 वर्षीय सज्जाद सेहेनच्या (Iraq Judoka Sajjad Sehen) नमुन्यात बंदी घातलेले मेटांडिएनोन आणि बोल्डेनोन हे पदार्थ आढळून आले आहेत. 28 वर्षीय सज्जाद मंगळवारी मैदानात उतरणार होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या डोपिंगविरोधी कार्यक्रमावर देखरेख करणाऱ्या आयटीएने सांगितले की, “खेळाडूविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली असून, त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.”
याचा अर्थ असा आहे की खेळाडूला ऑलिंपिक खेळांदरम्यान स्पर्धा, प्रशिक्षण किंवा कोणत्याही प्रक्रियेत भाग घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. एजन्सीने सांगितले की, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या 81 किलो गटातील उझबेकिस्तानच्या खेळाडूला पुढच्या फेरीत चाल देण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक डोपिंग प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पॅरिसच्या सीन नदीवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला क्रीडाप्रेमींनी अत्यंत रटाळ म्हटले. तर, यादरम्यान अनेक गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे खेळाडूंनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. काही खेळाडूंच्या साहित्याची चोरी झाल्याचे प्रकरण देखील समोर झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हँडबॉलपटूने हॉकी खेळाडूला सर्वांसमोर केले ‘फिल्मी स्टाईल प्रपोज’, पाहा व्हिडिओ
“सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावरून भडकली कंगना
जो रुटचा धमाका, कसोटीमध्ये ब्रायन लाराचा विक्रम मोडला; आता बारी सचिनची!