भारताचा कर्णधार विराट कोहलीने आगामी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या अचानक जाहीर केलेल्या निर्णयामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. अनेक दिग्गजांनी विराटच्या या निर्णयाचे स्वगत केले आहे. अशात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही विराटने घेतलेल्या या निर्णयावर त्याचे मत व्यक्त केले आहे.
इरफान पठाण स्पोर्टस्टारशी बोलत होता. त्याने मान्य केले की कोहलीच्या या निर्णयामूळे तो हैराण झाला आहे. करण त्याच्या मते, खेळाडू सहसा मोठ्या स्पर्धा संपल्यानंतर अशाप्रकारचे निर्णय घेतात. त्याच्या म्हणण्याचा असा अर्ध होता की, कोहलीने विश्वचषकानंतर अशाप्रकारची घोषणा करायला हवी होती. कारण स्पर्धेचा निकाल त्याच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतो. जर भारतीय संघ टी २० विश्वचषक जिंकला तर काय होईल? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
इरफान म्हणाला, “या घोषणेच्या वेळेने मला निश्चित स्वरूपात आश्चर्यचकित केले आहे, कारण तुम्ही सहसा एका स्पर्धेनंतर अशाप्रकारचा निर्णय घेता. मला आश्चर्य वाटते की, जर आपण टी २० विश्वचषक जिंकला तर काय होईल?”
“तो एक अद्भूत खेळाडू राहिला आहे आणि आपण पाहिले आहे की, तो नेतृत्वाच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमध्ये काय करू शकतो. त्याने आयसीसी स्पर्धा जिंकली नाही, तर त्याच्यावर प्रश्न उपस्थित होतील. मात्र, मला विश्वास आहे की, त्याने खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे,” असे तो पूढे म्हणाला.
इरफान पूढे म्हणाला की, “हा कोणासाठीच सोपा निर्णय नाहीये, पण मला आशा आहे की, विराटचा वारसा जपण्यासाठी आपण हा विश्वचषक जिंकू. मला आशा आहे की, तो जेतेपद जिंकून याला स्टाइलमध्ये संपवू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट लवकरच आरसीबीचे नेतृत्वही सोडेल”
भारतीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी ‘हे’ चार युवा खेळाडू असतील प्रमुख दावेदार
कुंबळेंच्या नेतृत्वात विराटची बॅट ओकते आग, वाचा ही जबरदस्त आकडेवारी