इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज न्यूझीलंडने अतिशय नाट्यमयरीत्या कसोटी सामना वाचवला. याबरोबर २ सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली.
एकवेळ ७ बाद २१९ अशी अवस्था असताना ईश सोधी आणि निल वॅग्नर यांनी टीच्चून फलंदाजी करताना संघाला पराभवापासून वाचवले. त्यांनी ५व्या दिवशी चक्क ३१.२ षटके खेळून काढली.
ईश सोधीने निल वॅग्नरला हाताशी धरत किल्ला लढवला. २०१ मिनीटं फलंदाजी करताना सोधीने १५८ चेंडूत संयमी ५६ धावांची खेळी केली.
त्याला तेवढीच चांगली साथ दिली ती निल वॅग्नरने. १०६ मिनीट फलंदाजी करताना निल वॅग्नरने १०३ चेंडूत केवळ ७ धावा केल्या. तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. तो बाद झाल्यावर पंचांनी लगेच दिवसाचा खेळ संपला असे घोषीत केले.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने अनेक प्रयत्न करुनही त्याला ही जोडी फोडण्यात अखेरपर्यंत अपयश आले.
याबरोबर सलग १३ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला विजय मिळवता आला नाही. २०१६ पासून आजपर्यंत या संघाने परदेशात कसोटीत विजय पाहिला नाही.
तर न्यूझीलंडने तब्बल १९ वर्षांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. यापुर्वी १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये ४ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळवला होता.
Batting heroes Ish Sodhi and Neil Wagner share a moment. Great stuff. #NZvENG pic.twitter.com/EeJljAEMBp
— Jarrod Gilbert (@JarrodGilbertNZ) April 3, 2018
What a brilliant effort! Ish Sodhi and Neil Wagner take a bow. It's very hard to not like this @BLACKCAPS team. They fight, play it fair and hard too. Magnificent rearguard. A deserved series win, Test cricket provides another thriller. #NZvENG pic.twitter.com/xbnNsGwVv5
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) April 3, 2018