भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशनला श्रीलंकाविरुद्ध जुलैमध्ये होणाऱ्या मालिका सामन्यासाठी निवड होऊ शकते. ईशानने मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक ठोकत आपले नाणे खणखणीत वाजवले होते. दरम्यान, त्याची चर्चा ही केवळ त्याच्या कामगिरीमुळेच नाही तर अनेकदा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींमुळेही होत असते.
ईशान गेल्या अनेक महिन्यांपासून आदिती हुंडियाबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याची म्हटले जाते. या दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे प्रेम व्यक्तही केले आहे. मात्र, आता आदितीने इंस्टाग्राम स्टोरीवर टाकलेल्या पोस्टमुळे त्या दोघांमधील नाते बिघडल्याचा कयास चाहते लावत आहेत.
आदिती हुंडियानी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट लिहिला होता. त्यामध्ये तिने असे लिहिले होते की, “प्रत्येक नातं लग्नापर्यंत जात नसतं, तर आपल्याला नवीन नवीन हॉटेल शोधायला मदत करते”. तिची ही स्टोरी पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या या स्टोरीने विचार करायला लावला आहे की, ईशान आणि तिच्यामध्ये काही बिनसलं आहे का? ते दोघे वेगळे होणार आहेत का? परंतु या दोघांपैकी कोणीही या गोष्टीचा खुलासा केलेला नाही.
आदितीबद्दल थोडेसे…
ईशानची कथित प्रेयसी आदिती हुंडीयाचा जन्म 15 जानेवारी 1997 ल राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. आदितीने 2016 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केले. तिला नेहमी मॉडेलिंगमध्येच करिअर करायचे होते. आदितीने ‘एलिट मिस राजस्थान’ या स्पर्धेत भाग घेतला होता. ती या स्पर्धेची उपविजेती होती. ती 2017 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया, राजस्थान’ या स्पर्धेची विजेती ठरली होती. त्याच वर्षी ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2017’ च्या सर्वोत्कृष्ट 15 जणींमध्ये ती होती. 2018 मध्ये तिने ‘ मिस सुपरनेचरल’चा किताब जिंकला होता.
ईशानची कारकिर्द
ईशान किशनने आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत भारतीय संघासाठी एकूण 60 धावा केल्या आहेत. याच दरम्यान 56 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 44 सामन्यात 37.53 च्या सरासरीने 2665 धावा बनविल्या. यात 5 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. अ दर्जाच्या सामन्यांत त्याने 77 सामन्यात 36.94 च्या सरासरीने 2549 धावा केल्या. या दरम्यान 4 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर तो आता सध्या मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 56 सामने खेळले असून 1284 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माझे हेडफोन्स कुठे आहेत?’, अनुष्काने विचारलेल्या प्रश्नावर विराटने दिले भन्नाट प्रत्युत्तर
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ तीन संघ बदलू शकतात आपले कर्णधार, कारणे घ्या जाणून