पुणे । बार्कलेज, इंडियन बँक या संघांनी प्रथम व्हिन्टेज कप आयटी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत कनिष्कसिंगच्या नाबाद शतकाच्या जोरावर बार्कलेज संघाने सीबीएसएल संघावर ९२ धावांनी मात केली. बार्कलेज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २४० धावा केल्या.
यात कनिष्कसिंगने ७७ चेंडूंत २२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १४२ धावा केल्या. दत्तात्रय रौथीने ३८ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७७ धावा केल्या. कनिष्क-दत्तात्रय जोडीने १६.२ षटकांत १९१ धावांची सलामी दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना सीबीएसएल संघाला ३ बाद १४८ धावाच करता आल्या.
दुस-या लढतीत इंडियन बँक संघाने टीई कनेक्टिव्हिटी संघावर ६२ धावांनी मात केली. इंडियन बँक संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२२ धावा केल्या. यात विजय कोहली याने ५४ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांसह १२१ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना टीई कनेक्टिव्हिटी संघाला ४ बाद १६० धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) बार्कलेज – २० षटकांत २ बाद २४० (कनिष्कसिंग नाबाद १४२, दत्तात्रय रौथी ७७, आकाश अहिर १-४२, अमोल झावरे १-२१) वि. वि. सीबीएसएल – २० षटकांत ३ बाद १४८ (अजय पाटील ४७, मनीष ४५, आकाश अहीर नाबाद २३, अभिषेक श्रीवास्तव १-१७, प्रशांत गजल १-१८).
२) इंडियन बँक – २० षटकांत ८ बाद २२२ (विजय कोहली १२१, आदित्य साळुंखे ३७, प्रकाश अत्रे ३-२३, तुषार नेर ३-२३) वि. वि. टीई कनेक्टिव्हिटी – २० षटकांत ४ बाद १६० (कौस्तव सर्मा नाबाद ६७, अबिद अली २४, निखिल पास्ते नाबाद २२, सौरभकुमार २-१७).