पुणे | सिनेक्रॉन, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत संजयसिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिनेक्रॉन संघाने हर्मन संघावर आठ गडी राखून मात केली. यात सिनेक्रॉन संघाने प्रथम फलंदाजी करणा-या हर्मन संघाला ६ बाद ११५ धावांत रोखले. हर्मन संघाकडून हेमंत परळकरने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. संजयसिंगने दोन गडी बाद केले. सिनेक्रॉन संघाने विजयी लक्ष्य १२.१ षटकांत २ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. संजयसिंगने ४७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या.
दुस-या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने यूबीएस संघावर ९ गडी राखून मात केली. यूबीएस संघाला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ९४ धावाच करता आल्या. प्रतीक शिंदेने ८ धावांत सहा गडी बाद केले. यानंतर यार्डी सॉफ्टवेअर संघाने विजयी लक्ष्य १२.२ षटकांत एका गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. यार्डीकडून स्वप्नील घाटगेने ३३ चेंडूंत ४३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – १) हर्मन – २० षटकांत ६ बाद ११५ (हेमंत परळकर ३५, नितीन नरळे ३१, हर्षद जोशी २-८, संजयसिंग २-१५) पराभूत वि. सिनेक्रॉन – १२.१ षटकांत २ बाद ११६ (संजयसिंग नाबाद ७४, कार्तिक हिरपारा १६, अभिषेक धनावडे १-३५).
२) यूबीएस – २० षटकांत ८ बाद ९४ (चेतन झडे २७, अंकित हांडा नाबाद १५, प्रतीक शिंदे ६-८, जीवन गोसावी १-१२, प्रतीक शिंदे १-५) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर – १२.२ षटकांत १ बाद १०० (स्वप्नील घाटगे ४३, अमित राडकर नाबाद ३५, राजन दरेकर १-१७).