पुणे | कॉग्निझंट, डेसॉल्ट सिस्टिम, एफआयएस ग्लोबल, मर्स्क या संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत कॉग्निझंट संघाने मिंडट्री संघावर १४ धावांनी मात केली. वैभव राजुरकर आणि पुनीत करणच्या संयमी खेळीच्या जोरावर कॉग्निझंट संघाने ७ बाद १२८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मिंडट्री संघाचा डाव १९.२ षटकांत ११४ धावांत आटोपला. कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या लढतीत डेसॉल्ट सिस्टिम संघाने सनगार्ड संघावर चार गडी राखून मात केली. सनगार्ड संघाने दिलेले १४५ धावांचे लक्ष्य डेसॉल्ट संघाने पीयूष इंगळेच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.४ षटकांत ६ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. एफआयएस ग्लोबल संघाने एचएसबीसी संघावर पाच गडी राखून मात केली. एचएसबीसी संघाने ८ बाद १४२ धावा केल्या. यात प्रवीण सोनीने तीन गडी बाद केले. यानंतर एफआयएस ग्लोबल संघाने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यानंतर वेंकटेश अय्यर आणि दिनेश वाडकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मर्स्क संघाने यूबीएस संघावर ७२ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक : १) कॉग्निझंट – २० षटकांत ७ बाद १२८ (पुनीत करण नाबाद ४४, वैभव राजुरकर ४३, अंकितकुमार ४-१५, हर्षल मानकर १-२५) वि. वि. मिंडट्री – १९.२ षटकांत सर्वबाद ११४ (पीयूष रॉय २३, उदय गलांडे १९, किरण जोंधळे २-२३, गौरव कुलकर्णी १-१०).
२) सनगार्ड – २० षटकांत ५ बाद १४४ (पवन आनंद नाबाद ४४, अभिजित देशपांडे नाबाद २१, अमित बारसे २१, विकाशकुमार २-१६, पीयूष इंगळे १-२३) पराभूत वि. डेसॉल्ट सिस्टिम – १९.४ षटकांत ६ बाद १४८ (पीयूष इंगळे ६१, संग्राम पाटील २३, अंशूल गोस्वामी २१, अनिल गुघे १-२१, कौस्तभ बाकरे १-२५).
३) एचएसबीसी – २० षटकांत ८ बाद १४२ (धवल बडगुजर २९, श्रावण नाईक २२, नलिन कामबोज २१, प्रवीण सोनी ३-१६, सुरज दुबळ २-३४) पराभूत वि. एफआयएस ग्लोबल – १८.४ षटकांत ५ बाद १४३(चेतन डोंगरे नाबाद २९, प्रशांत पोळ २८, सचिन पाटील २६, रोहित भटालिया २०, प्रवीण सोनी नाबाद २०, संजयकुमार लोखंडे २-१९).
४) मर्स्क – २० षटकांत २ बाद १८७ (वेंकटेश अय्यर नाबाद ६१, दिनेश वाडकर नाबाद ६३, राघव त्रिवेदी ३३, हितेश पांचाळ २२, अंकित हांडा १-२३) वि. वि. यूबीएस – १९.२ षटकांत सर्वबाद ११५ (चेतन झडे ३२, पौरिक पटेल १९, अदिभ गजभिये १९, राकेश पिल्लई २-२३, वेंकटेश अय्यर २-२०, दिनेश वाडकर २-६).