ऑस्ट्रेलियाचे जॅक मॉरिसन ग्रेगरी यांची कसोटी कारकीर्द फार काही मोठी नव्हती. परंतु त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १९२० च्या सुरुवातीला ग्रेगरी यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना दहशतीत ठेवले.
ग्रेगरी यांना उजव्या हाताचे घातक गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी २४ कसोटी सामन्यात ३१.१५ च्या सरासरीने ८५ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी २४ कसोटी सामन्यात २ शतकांसोबत ३६.९६ च्या सरासरीने ११४६ धावा केल्या. त्यांनी कसोटी कारकिर्दीत ग्लोव्हजचा वापर न करत डाव्या हाताने फलंदाजी केली.
ग्रेगरी यांच्या नावावर २ असे विक्रम आहेत, जे आजही अबाधित आहेत. १९२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्यांनी केवळ ७० मिनिटे फलंदाजी करत अवघ्या ६७ चेंडूत शतक ठोकले होते. त्यावेळी त्यांचे हे शतक कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान शतक राहिले होते. त्यांनी केवळ सर्वात कमी चेंडूतच शतक पूर्ण केले नाही, तर शतक साजरे करण्यासाठी ग्रेगरी क्रीजवरही सर्वात कमी वेळ थांबले होते.
सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याबद्दल बोलायचं झालं, तर ग्रेगरी यांचा हा विक्रम ६५ वर्षे अबाधित होता. वेस्ट इंडिजचे धुरंदर सर विवियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडविरुद्ध सेंट जॉन्स येथे १९८६ साली केवळ ५६ चेंडूत शतक पूर्ण करत ग्रेगरी यांचा विक्रम मोडला होता. परंतु ग्रेगरी यांचे सर्वात कमी मिनिटांमध्ये शतक पूर्ण करण्याचा विक्रम आजही अबाधित आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे खेळाडू (सर्वात कमी मिनिटांत)
१. ७० मिनिटे- जॅक ग्रेगरी (ऑस्ट्रेलिया)- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९२१-२२
२. ७४ मिनिटे- मिस्बाह उल हक (पाकिस्तान)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१४-१५
३. ७७ मिनिटे- गिलबर्ट जेसॉप (इंग्लंड)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९०२
४. ७८ मिनिटे- रिची बेनॉड (ऑस्ट्रेलिया)- विरुद्ध वेस्ट इंडिज, १९५४-५५
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे खेळाडू (सर्वात कमी चेंडूत)
१. ५४ चेंडू- ब्रेंडन मॅक्यूलम (न्यूझीलंड)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१५-१६
२. ५६ चेंडू- सर विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)- विरुद्ध इंग्लंड, १९८५-८६
३. ५६ चेंडू- मिस्बाह उल हक (पाकिस्तान)- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१४-१५
४. ५७ चेंडू- ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)- विरुद्ध इंग्लंड, २००६-०७
५. ६७ चेंडू- जॅक ग्रेगरी (ऑस्ट्रेलिया)- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९२१-२२
जॅक ग्रेगरी यांच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम आहे. क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी एका मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा कीर्तिमान रचला आहे. ग्रेगरी यांनी १९२०-२१ च्या ऍशेस मालिकेदरम्यान १५ झेल घेतले होते. हा विक्रम आजही एक क्षेत्ररक्षक म्हणून कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
१. १५ झेल- जॅक ग्रेगरी (ऑस्ट्रेलिया)- विरुद्ध इंग्लंड, ५ कसोटी सामने, १९२०-२१
२. १४ झेल- केएल राहुल (भारत), विरुद्ध इंग्लंड, ५ कसोटी सामने, २०१८
३. १४ झेल- ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), विरुद्ध इंग्लंड, ६ कसोटी सामने, १९७४-७५
४. १३ झेल- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), विरुद्ध भारत, ४ कसोटी सामने, २००६
ग्रेगरी हे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू डेव्ह आणि नेड ग्रेगरी यांचे पुतणे होते. इंग्लंडविरुद्ध डिसेंबर १९२८ मध्ये ब्रिस्बेन कसोटी दरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे ग्रेगरी यांची क्रिकेट कारकीर्द अचानक संपुष्टात आली. त्यांना १९२२ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयरने सन्मानित केले होते.
१९७३ मध्ये ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी या दिग्गद अष्टपैलू खेळाडूचे निधन झाले होते.
ट्रेंडिंग लेख-
-असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
-५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
-‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
महत्त्वाच्या बातम्या-
-‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित
-कुलदीप यादवच्या वर्कआउटचा व्हिडिओ पाहून फॅन्स झाले हैराण; मात्र धवनने केले ट्रोल
-२०२२ च्या विश्वचषकात खेळणार का? झुलन गोस्वामी म्हणाली…