भारतात क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकार हे कायमच एकत्र दिसतात. कधी हे कलाकार क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावतात तर कधी क्रिकेटपटू बॉलीवूडमधील चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा पार्ट्यांना हजेरी लावतात.
परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र बऱ्यापैकी बदलून आजकाल हे कलाकार मंडळी इतर खेळांकडेही आकर्षित होऊ लागले आहेत. अगदी बॅडमिंटन, टेनिस किंवा फुटबॉलच्या सामन्यालाही ही मंडळी आवर्जून उपस्थित असतात.
परंतु या सर्वात कोणता खेळ सर्वात जास्त भाव खाऊन जात असेल तर प्रो कबड्डी. प्रो कबड्डीच्या प्रत्येक सामन्याला कोणता ना कोणता मोठा कलाकार हा नक्कीच उपस्थित असतो. या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरमुळे याचा निश्चित खेळाडूंना फायदा होत आहे.
अक्षय कुमार, विद्यत जामवाल, कमल हसन तसेच दक्षिणेतील दिग्गज कलाकारांनंतर आता जॅकलिन फर्नांडिस या बॉलीवूडमधील मोठ्या अभिनेत्रीने काल गुजरात लेग अहमदाबाद येथे सुरु असलेल्या सामन्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी जॅकलिनने कबड्डी खेळण्याचा आनंदही घेतला. याचा संपूर्ण व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने प्रो कबड्डीच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
पहा हा संपूर्ण विडिओ:
.@Asli_Jacqueline drives people into a tizzy when onscreen! Here's how she got a taste of it herself with #DizzyKabaddi! #VivoProKabaddi pic.twitter.com/MDMHetFJ6J
— ProKabaddi (@ProKabaddi) August 18, 2017
https://www.facebook.com/ProKabaddi/videos/1404664712985600/?autoplay_reason=gatekeeper&video_container_type=0&video_creator_product_type=2&app_id=2392950137&live_video_guests=0