भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी कटकमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून मालिकेत बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत हा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि विंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डर टेबल टेनिस खेळताना दिसले. हा व्हिडिओ वेस्ट इंडिजच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की ‘जेसन होल्डर आणि शिवम दुबे हॉटेलमध्ये मैत्रीपूर्ण टेबल टेनिसचा सामना खेळत आहेत.’ हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#INDvWI Jason Holder and Shivam Dube 🏓 in a friendly game at team hotel. These guys can play!!!#Weekend #MenInMaroon #ItsOurGame #SpiritOfCricket pic.twitter.com/Ti5cVA3xkw
— Windies Cricket (@windiescricket) December 21, 2019
पहिल्या सामन्यात दुबेची कामगिरी निराशाजनक होती. त्याने 7.5 षटकात 68 धावा दिल्या. यानंतर विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात दुबेला अंतिम 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले.
पण आता संघाचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर असून नवदीप सैनीला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कर्णधार कोहली निर्णायक सामन्यात गोलंदाजीसोबत फलंदाजीची कमकुवतता भरून काढण्यासाठी शिवम दुबेला संघात समाविष्ट करणार का हे पहावे लागणार आहे.
चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेच्या दुसर्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन केले आणि विजय मिळवला.
आता दोन्ही संघ तिसर्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. आता विजय नोंदविण्यात कोणता संघ यशस्वी ठरतो हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
'काय पो छे' चित्रपटातील हा बालकलाकार आता खेळणार आयपीएल २०२०मध्ये! https://t.co/ZktWKyg52t#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
गतविजेता रायगड, पुणेसह यजमान रत्नागिरीच्या संघांचा बादफेरीत प्रवेश
वाचा👉https://t.co/MscIzvxACl👈#म #मराठी #Kabaddi @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019