---Advertisement---

बापरे! तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह

---Advertisement---

भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळात पैसाही ओघाने अधिक आला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक खेळाडू कोट्यावधी रुपये कमवतात. त्यामुळे अनेक चाहत्यांना खेळाडूंची जीवनशैली जाणून घेण्यात रस असतो. त्यांची संपत्ती व त्यांचे विविध प्रकारचे गाड्या किंवा इतर कलेक्शन जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आज आपण भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची किती संपत्ती आहे ती जाणून घेणार आहोत

जसप्रीत बुमराह हा जगभरात यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध आहे. जसप्रीत बुमराहने आता पर्यंत आपल्या यॉर्करच्या कौशल्याने चांगल्यातील चांगल्या फलंदाजांना शांत बसविले आहे. बुमराह सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप व इंग्लंड सोबतच्या मालिकेसाठी इंग्लंडला आहे.

बुमराहने आयपीएलमध्ये चमकत भारतीय संघात खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला आज मिळत आहे . त्याच्या परिश्रमामुळे आज त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. चला या लेखात आपण जसप्रीत बुमराह बदल जाणून घेणार आहोत त्याची संपत्ती.

१. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह यांचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. जसप्रीत बुमराहने आता पर्यंत आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो व त्याने मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट असे प्रदर्शन ही केले आहे . आता बुमराह हा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा आणि नियमित खेळाडू झाला आहे. त्यानी त्याच्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीने त्याची एक मोठी ओळख निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/p/CN1nFkkntcj/

२. बुमराहची वार्षिक वेतन

बीसीसीआय सर्व खेळाडूंना त्यांच्या श्रेणी नुसार वार्षिक वेतन देते. रोहित शर्मा व विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या वार्षिक मानधनाच्या करारात ‘अ+’ श्रेणीत आहे. त्यामुळे बीसीसीआय बुमराहला वार्षिक ७ कोटी रुपयांचे वेतन देते. त्याशिवाय बीसीसीआय प्रत्येक खेळाडूला कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये देते. एकदिवसीय सामन्यांसाठी ६ लाख आणि टी२० साठी ३ लाख देत.

https://www.instagram.com/p/B9WGh6vncn1/

३. बुमराहची आयपीएल सॅलरी

यॉर्कर किंग बुमराह हा आयपीएलमध्ये २०१३ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज म्हणून बुमराहला दर आयपीएल मोसमात १२ करोड रुपयो दिले जातात.

https://www.instagram.com/p/B0YAlY4nbfV/

४. बुमराहचे घर व कार कलेक्शन

माहिती नुसार, बुमराहला फोर व्हीलर गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे एक आलिशान रेंज रोवर आहे व एक आलिशान बंगला आहे ज्याची किंमत आज ४ करोड आहे.

https://www.instagram.com/p/CL6MRlvHZY4/

५. जसप्रीत बुमराहची संपूर्ण संपत्ती
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची हा ३० करोड च्या संपत्तीचा मालक आहे. जसप्रीत बुमराहने आता पर्यंत भारतासाठी एकूण १९ कसोटी , ६७ वनडे आणि ४९ टी२० सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

अनुभवी भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्यावर दुर्लक्षित, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे

लॉर्ड्स कसोटीवर न्यूझीलंडची पकड, कॉनवेच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी

कसोटी पदार्पणात द्विशतक करत कॉनवे आला ‘या’ फ्रँचायझीच्या नजरेत, गाजवणार आयपीएलचं मैदान?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---