भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात चांगली सुरुवात करू शकला नाही. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद 195 धावसंख्या उभारली. या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी केली. त्यानंतर भारतीय फलंदाजीची रणनिती काय असणार याबदद्ल त्याने खुलासा केला आहे.
एकावेळी एका सत्रावर करू लक्ष केंद्रित
भारतीय संघ मागील कसोटी सामन्यात 36 धावांवर गुंडाळला गेला होता. त्यामुळे दुसर्या सामन्यात भारतीय संघाची रणनिती वेगळी असणार आहे. या गोष्टीचा खुलासा जसप्रीत बुमराहने केला आहे. जसप्रीत बुमराह म्हणाला, “आम्ही फलंदाजी करताना एका वेळी फक्त एका सत्राचा विचार करणार आहोत. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजी करताना दूरचा विचार करणार नाही. फक्त एकावेळी एका सत्रावर लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे फलंदाजी करताना अडचण येणार नाही.”
गोलंदाजांबद्दलही व्यक्त केले मत
गोलंदाजी करताना आर अश्विनला लवकर घेऊन येण्याच्या आक्रमणाबद्दल बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “सकाळच्या ओलाव्याचा फायदा उठवण्यासाठी त्याला लवकर आणले होते. सकाळी आम्ही गोलंदाजी करत होतो, तेव्हा खेळपट्टी ओली दिसत होती. त्यामुळे आम्ही जडेजा आणि अश्विनला गोलंदाजीसाठी लवकर घेवून आलो.” जसप्रीत बुमराह पदार्पण करत असलेल्या सिराजबद्दल म्हणाला, “त्याने खूप मेहनत केली, तेव्हा तो इथे पोहचला आहे.”
सिराजचे कौतुक करताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “तो आपल्या कौशल्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करत होता. त्याने खूप शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याच्या गोलंदाजीमध्ये आत्मविश्वास दिसत आहे.”
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फक्त 195 धावाच केल्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलिया संघावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघावर दडपण आले आणि या संघाने एक ही मोठी भागीदारी केली नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक धावसंख्या मार्नस लॅब्यूशानेने केली. त्याने 132 चेंडूचा सामना करताना 48 धावांची खेळी केली. त्याला पदार्पण करत असलेल्या सिराजने झेलबाद केले.
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात गोलंदाजांनी कमाल केली. या डावात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 56 धावा देताना 4 बळी टिपले. त्याचबरोबर अश्विनने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना पुन्हा एकदा दुसर्या कसोटी आपल्या फिरकीने 35 धावा देताना 3 बळी टिपले. मोहम्मद सिराजने 40 धावा देताना 2 गडी बाद केले, तर जडेजाने 1 गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो खूप मेहनतीने इथे पोहोचला आहे’, भारताच्या प्रमुख गोलंदाजाने केली सिराजची प्रशंसा
मुश्ताक अली स्पर्धेतून ‘कॅप्टन कूल’ करणार पुनरागमन? धोनीने स्वतःच दिले स्पष्टीकरण
पाकिस्तान संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सहा आठवड्यांसाठी संघातून बाहेर