भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एमए चिदंबरम स्टेडियमवर आपल्या कसोटी कारकिर्दीतील १८वा सामना खेळत आहे. हा सामना एका वेगळ्याच कारणामुळे त्याच्यासाठी खास ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेला हा सामना घरच्या मैदानावरील बुमराहचा पहिलाच कसोटी सामना आहे. या विशेष सामन्यातील आपल्या पहिल्या ७ षटकातच त्याने मोठी विकेट घेतली आहे. त्याच्या या विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
झाले असे की, नाणेफेक जिंकत पाहुण्या इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडचे सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. परंतु भारताचा फिरकीपटू आर अश्विनने ३३ धावांवर बर्न्सला माघारी धाडले. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर डॅरेन लॉरेन्स फलंदाजीसाठी आला. मात्र कर्णधार विराट कोहली आणि बुमराहने मिळून साधे एक षटकही त्याला खेळू दिले नाही.
इंग्लंडचा नवखा फलंदाज लॉरेन्सचा सामना करण्यासाठी विराट अश्विनचा वापर करेल, असे सर्वांना वाटत होते. परंतु कर्णधार विराटने बुमराहचे शस्त्र वापरण्याचा विचार केला आणि त्याला डावातील २६ वे षटक टाकण्यासाठी पाठवले. बुमराहने षटकातील चौथा चेंडू टाकला आणि चेंडू टप्पा घेऊन सरळ लॉरेन्सच्या पायाला जाऊन लागला.
तडखाफडकी आपली विकेट गेल्याचे पाहून लॉरेन्सलाही स्वत:वर विश्वास बसला नाही. त्याने आपला संघसहकारी सिब्लेला रिव्ह्यू घेण्याबाबत चर्चा केली. परंतु पंचांनी तो पायचित असल्याचे घोषित केले. अशाप्रकारे लॉरेन्स शून्य धावेवर बाद झाला आणि बुमराहला घरच्या मैदानावर आपली पहिली कसोटी विकेट मिळाली.
A beautiful delivery by Jasprit Bumrah to take his first test wicket on home soil. #TeamIndia #INDvENG #WTC21 #Bumrah @BCCI @Jaspritbumrah93 @GCAMotera pic.twitter.com/shXXiDuNar
— Dhanraj Nathwani (@DhanrajNathwani) February 5, 2021
https://twitter.com/7shivamjaiswal/status/1357572464604184579?s=20
https://twitter.com/cristorian_45/status/1357570549510139904?s=20
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडचा डाव २ बाद १२९ धावांवर आहे. सलामीवीर डॉम सिब्ले आणि कर्णधार जो रूट फलंदाजी करत आहेत. सिब्लेचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. १७७ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने हा पराक्रम केला आहे. तर रूट ४० धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेला मिळणार नवा कसोटी कर्णधार; डी कॉकला कर्णधारपदावरून काढले जाणार