---Advertisement---

या कारणामुळे बुमराह नाही खेळू शकला रणजी सामना…

---Advertisement---

मागील अनेक महिन्यांपासून पाठिच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह भारतीय संघापासून दूर होता, पण आता 5 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची भारतीय संघात निवड झाली आहे.

जसप्रीत बुमराहला रणजी ट्रॉफी या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघात स्थान देण्यात आले. त्याला केरळविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती , परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या निर्णयानंतर बुमराहने रणजी सामने खेळण्यास नकार दिला.

आता या निर्णयामागील मुख्य कारण समोर आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर जसप्रीत बुमराहने सामने खेळू न शकण्याचे मुख्य कारण संघाला मिळालेले आदेश होते. बुमराहला प्रतिदिन 12 षटकेच गोलंदाजी देण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्यामुळे गुजरात संघाने गांगुली आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी याबद्दल चर्चा केली.

गुजरात संघाच्या व्यवस्थापणेने असे सूचित केले होते की, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफच्या सदस्याने अनधिकृत आदेश दिले होते की, बुमराहला आठ ते नऊ षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करू देऊ नये.

गुजरात संघाचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याशी या बाबतीत बोलणे झाले. यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने निर्णय घेतला की, बुमराह रणजी सामने न खेळता श्रीलंकेविरूद्ध टी20 सामने खेळेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---