सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
‘ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात भाग्यशाली ठरला. कारण एम एस धोनीला चुकीचे बाद दिले होते’, असे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झे रिचर्डसनने सांगितले आहे. धोनीला जेसन बेऱ्हेनडॉर्फने ५१ धावांवर असताना पायचीत केले होते. मात्र टीव्हीमध्ये तो चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडून गेला होता.
यावेळी भारताकडे डीआरएस रिव्ह्युच शिल्लक नसल्याने धोनीने रिव्ह्यू घेतला नाही. अंबाती रायडूने आधीच एक रिव्ह्यु गमावला होता. यामुळे धोनीची आणि रोहित शर्माची १३७ धावांची महत्त्वाची भागीदारी तुटली.
या सामन्यात बेऱ्हेनडॉर्फने शिखर धवनला पायचीत करत भारताला पहिला धक्का दिला होता. त्याने ३९ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
‘धोनी आणि रोहित उत्तम खेळत होते. त्या दोघांची भागीदारी तुटल्याने आम्ही हा सामना जिंकू शकलो’, असे रिचर्डसन म्हणाला.
भारताच्या फलंदाजी फळीला सुरूंग लावणाऱ्या सामनावीर रिचर्डसनने २६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा या महत्त्वाच्या विकेट्स पटकावल्या.
India are out of reviews and Dhoni has to go… #CloseMatters#AUSvIND | @GilletteAU pic.twitter.com/WRYVQPxwIM
— cricket.com.au (@cricketcomau) January 12, 2019
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा वन-डे सामना १५ जानेवारीला अॅडलेड येथे तर तिसरा सामना १८ जानेवारील मेलबर्न येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषक गाजवलेल्या या खेळाडूला हार्दिक पंड्या, केएल राहुल ऐवजी भारतीय संघात मिळाले स्थान
–काय सांगता! या संघाने जिंकले १००० सामने…
–रोहित शर्माने किंग कोहलीचाही विक्रम टाकला मागे, आता फक्त तेंडुलकर आहे पुढे