---Advertisement---

धोक्याची घंटा! जो रुट थांबायचं नाव घेईना, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार?

---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये जो रुट सध्या धावांचा पाऊस पाडतोय. मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून त्यानं एक ऐतिहासिक विक्रम केला. रुट आता इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ॲलिस्टर कूकनं आपल्या कसोटी कारकिर्दीत 12,472 धावा केल्या होत्या. रुटनं आता त्याला मागे टाकलं आहे.

जो रुटचं पुढील लक्ष्य भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड आहे, ज्यानं 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या. रुट अजूनही त्याच्यापासून दूर आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या 21 कसोटी डावांमध्ये रुटनं 56 पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या. या 21 डावांमध्ये त्यानं 5 शतकं आणि 4 अर्धशतकं ठोकली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिननं 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, जो रुटनं अद्याप 13 हजार धावाही पूर्ण केल्या नाहीत. जर रुटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनायचं असेल, तर त्याला 3,300 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. रुटनं दरवर्षी हजाराहून अधिक धावा केल्या, तरी सचिनला मागे टाकण्यासाठी त्याला किमान 3 वर्ष कसोटी क्रिकेट खेळावं लागेल.

दुसरीकडे, शतकांबद्दल बोलायचं झालं तर, सध्या सचिनच्या आसपासही कोणी नाही. सचिननं आपल्या कसोटी कारकिर्दीत 51 शतकं झळकावली आहते. तर रुटनं आतापर्यंत 34 शतकं झळकावलीत. परंतु धावांच्या बाबतीत रुटचा फॉर्म असाच कायम राहिला, तर तो सचिन तेंडुलकरला नक्कीच मागे सोडू शकतो.

हेही वाचा – 

एकेकाळी आपल्या गोलंदाजीनं केलं भल्या-भल्यांना गार, आता टीम इंडियामध्ये या दिग्गजाचं पुनरागमन अशक्य!
जो रूटचा बलाढ्य विक्रम, विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपासही नाही
जो रुटचा धमाका! एका झटक्यात मोडले कसोटीतील 3 मोठे रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---