सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंका दौर्यावर आहे. त्यामुळे श्रीलंका आणि इंग्लंड संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी पासून गॉले येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्या डावात सर्वबाद 135 धावा केल्या. इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना डोमिनिक आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी श्रीलंका संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावताना या दोघांनी अनुक्रमे 5 आणि 3 गडी बाद केले.
इंग्लंड संघाचा जो रूट सध्याच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने इंग्लंड संघाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना नाबाद शतकी खेळी केली आहे. त्याने 254 चेंडूचा सामना करताना 168 धावांवर खेळत आहे. यामध्ये त्याने 12 चौकार लगावले आहे. जो रूटने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक पूर्ण केले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघासाठी सर्वाधिक शतके करणारा तो बारावा खेळाडू ठरला आहे.
इंग्लंड संघाकडून सर्वात जास्त शतके ठोकणारे खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाकडून सर्वात जास्त शतके करणारा खेळाडू ऍलिस्टर कूक आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाकडून 161 सामने खेळताना त्याने 33 शतके ठोकली आहे. त्याच्यानंतर दुसर्या क्रमांकावर केविन पीटरसन आहे.. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 23 शतके ठोकली आहेत. तिसर्या क्रमांकावर वॅली हेमंड, कॉविन कॉड्रे, गॉफ बॉयकॉट आणि इयान बेल आहे. त्यांनी इंग्लंड संघासाठी खेळताना प्रत्येकी 22 शतके केली आहे. त्यानंतर या यादीत 12 व्या स्थानी जो रूट आहे.
इंग्लंडचे सामन्यात वर्चस्व
इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात पहिला दिवस संपला तेव्हा 41.2 षटकांत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. त्यांनंतर पुढे खेळताना इंग्लंड संघाने पावसामुळे खेळ थांबला तेव्हा 94 षटकांत 4 गडी गमावून 320 धावा केल्या आहेत. यामध्ये जॉनी बेयस्ट्रोने 93 चेंडूत 47 धावांची खेळी करून बाद झाला त्याचबरोबर डॅनियल 150 चेंडू खेळताना 73 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 6 चौकार अणि 1 षटकार खेचला.
त्यानंतर खेळ थांबला तेव्हा जो रूट आणि बटलर खेळत आहेत. या दोघांनी अनुक्रमे 168 आणि 7 धावा केल्या आहेत. श्रीलंका संघाकडून लसिथने 3 गडी बाद केले आहे, तर परेराने 1 गडी बाद केला आहे. पावसाने खेळ थांबला परंतु तोपर्यंत इंग्लंड संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 185 धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला गोलंदाजी करताना पाहून दिनेश कार्तिकने ‘या’ दोन गोलंदाजाना दिली चेतावणी
‘त्याला’ ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात स्थान न दिल्याने माजी दिग्गजाने फटकारले
लॅब्यूशेनने शतकी खेळीने करत केवळ स्मिथलाच नाही तर ‘या’ दिग्गजांनाही टाकले मागे