जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात न्यू वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात आज एकाही फिरकी गोलंदाजाला स्थान मिळालेले नाही.
११९० नंतर असे फक्त तिसऱ्यांदा झाले आहे. याआधी १९९२ मध्ये सिडनी क्रिकेट स्टेडिअमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात एकाही फिरकी गोलंदाज भारतीय संघात नव्हता. या संघात श्रीनाथ, बॅनर्जी, कपिल देव, प्रभाकर या चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली होती.
त्यानंतर असे २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच पर्थमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात झाले होते. त्यावेळी भारतीय संघात इशांत शर्मा, झहीर खान, उमेश यादव आणि विनय कुमार या चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली होती तर या संघातही एकाही फिरकी गोलंदाजांचा समावेश नव्हता.
आजही भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या चार वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात आर अश्विन या फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले होते मात्र आता त्याच्या ऐवजी पहिल्या सामन्यात उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.