fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत वेदांत जोशी, आरव मुळ्ये यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

 

पुणे | पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील  तिस-या  आयकॉन ग्रुप लिटिल  कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019  स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांत जोशी, आरव मुळ्ये या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सेंटर फॉर पोलिस रिसर्च(सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित वेदांत जोशी याने चौथ्या मानांकित युग उपरिकरचा 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आरव मुळ्ये याने तिसऱ्या मानांकित स्मित उंदरेचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरे हिने ताश्वी पांडेचा 5-0 असा, तर तिसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने अनन्या गोयलचा 5-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 8वर्षाखालील मुले:
अंशूल पुजारी(1) वि.वि.नील देसाई (8) 6-3;
वेदांत जोशी वि.वि.युग उपरिकर(4) 6-3;
आरव मुळ्ये वि.वि.स्मित उंदरे(3) 6-5(3);
क्रिशय तावडे(2) वि.वि.युगंधर शास्त्री 4-2सामना सोडून दिला;

8 वर्षाखालील मुली:
श्रावी देवरे(1) वि.वि.ताश्वी पांडे 5-0;
सृष्टी सूर्यवंशी(3) वि.वि.अनन्या गोयल 5-1;
वीरा हरपुडे(4) वि.वि.ओवी मारणे 5-2;
स्वरा जावळे(2) वि.वि.प्रार्थना खेडकर 5-2.

You might also like