या आठवड्यात शुक्रवारपासुन कबड्डीची दुबई मास्टर्स स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, इराण, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, केनिया आणि अर्जेंटीना हे संघ आहेत.
कबड्डी विश्वातील एक उदयोन्मुख संघ म्हणुन कोरियाकडे पाहिले जाते. या संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. या देशाने या खेळासाठी अगदी तळागाळात घेतलेल्या परिश्रमामुळे हा संघ चांगला प्रगती करत आहे.
२०१६ कबड्डी विश्वचषकात भारतीय संघाला या कोरीयाकडून पराभव स्विकारावा लागला होता. ३४-३२ असा झालेल्या सामन्यात कोरीयाने भारताला भारतात पराभूत केले होते.
यातील दक्षिण कोरियाच्या संघातील जॅन्ग कुंग ली आणि प्रतिभाशाली डेव्हिड मोसाम्बाईवर यांची कामगिरी त्यांच्या संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
जॅन्ग कुंग ली या स्पर्धेत कोरीयाचं नेतृत्व करत आहे. आणि ह्या खेळाडूकडे प्रो कबड्डीमधील एक स्टार खेळाडू म्हणुन पाहिले जाते.ब गटात असलेला हा संघ इराणसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.
कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. यात दक्षिण कोरियाचा संघ या स्पर्धेत ब गटातून खेळताना दिसेल. तसेच त्यांच्याबरोबर या गटात इराण आणि अर्जेंटीनाचा समावेश आहे. तर अ गटात भारत, पाकिस्तान आणि केनिया हे संघ आहेत.
दक्षिण कोरियाचा पहिला सामना विश्वचषकातील उपविजेत्या इराण विरुद्ध स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 22 जूनला रात्री 9 वाजता होणार आहे.
स्पर्धेत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
असा आहे दक्षिण कोरियाचा संघ: ली डाँग जिओन, इओम ताई देओक, ली जेए मीन, जॅन्ग कुंग ली, हाँग डाँग ज्यू, किम डाँग ग्यू, पार्क चॅन सिक, जो जा पिल, किम सोंग रेओल, पार्क ह्यून इल, किम ग्यूंग ते, को याँग चाँग.
महत्त्वाच्या बातम्या:
दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…
केसाने कापला होता या दिग्गज भारतीय फलंदाजाचा गळा!
रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज