आॅस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण अाफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात अाफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी १०१ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. आज दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ २३९ धावांवर बाद झाला.
आॅस्ट्रेलियाला सर्वबाद करताना दक्षिण अाफ्रिकाकडून कागीसो रबाडाने २२ षटकांत ५४ धावा देत ६ विकेट घेतल्या तर केशव महाराज अाणि लुंगी न्गीडी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात २२ वर्षीय रबाडाने अनेक विक्रम केले. ते असे-
-२८ कसोटी सामन्यानंतर सर्वाधिक विकट्स घेणारा कागीसो रबाडा (१३५) ६वा खेळाडू
-कागीसो रबाडा प्रत्येक ३९व्या चेंडूवर कसोटीत विकेट घेतली आहे. १२० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल
-२३ वर्ष वय होण्यापूर्वी कसोटी सामन्यात १० विकेट घेणारा ४ वेळा घेणारा रबाडा वकार यूनीस नंतर दुसरा खेळाडू. रबाडाने २८ तर वकार यूनीसने ३३ कसोटीत ही कामगिरी केली.
-कसोटी डावात ९ वेळा ५ विकेट घेणारा कागीसो रबाडा सर्वात तरुण दक्षिण अाफ्रिकन खेळाडू
-कागीसो रबाडाच्या कसोटी पदार्पणानंतर त्याने ४ वेळा सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. जगातील अन्य सर्व खेळाडूंनी मिळून ३वेळा अशी कामगिरी केली आहे.