-पराग कदम
जय भवानी क्रीडा मंडळ कोयना वैतरणानगर अब्जे ता वाडा जिल्हा पालघर आयोजित समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा दि ४ व ५ मार्च २०१९ रोजी कोयना वैतरणानगर अब्जे येथे पार पडली.या स्पर्धेमध्ये दसपटी व कोयना प्रकल्पग्रस्त विभागातील संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
पहिल्या दिवशी राष्ट्रीय खेळाडु प्रदीप शिंदे याच्या नेतृत्वाखाली खेळणारा कळकवणे क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण व रानसई उचाट खालापुर रायगड या दोन संघांनी सर्वोत्तम खेळ पेश करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय खेळाडु आत्माराम कदम यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा ओवळी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण व श्री केदारनाथ वेळे पनवेल रायगड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
पहिला उपांत्य फेरीचा सामना बरोबरीत झाल्यामुळे पाच पाच चढाईमध्ये अनुभवाच्या जोरावर कळकवणे संघाने २ गुणांनी सामना जिंकला. तर दुसरी उपांत्य फेरीची लढत ओवळी संघाने ३० विरुद्ध १६ असा जिंकला.
अंतिम सामना कळकवणे संघाचा राष्ट्रीय खेळाडु प्रदीप शिंद व ओवळी संघाचा राष्ट्रीय खेळाडू आत्माराम कदम यांच्यात झाला यात कळकवणे संघाकडून प्रदीप शिंदे, अक्षय शिंदे, संकेत घडशी, शैलेश वणगे, ऋषी कदम, प्रथमेश झुझम, नितीन शिंदे यांनी बहारदार खेळ करीत संघाला ३५-०९ विजय मिळवून दिला. तर ओवळी संघाकडून आत्माराम कदम, ओमकार सकपाळ, ऋषी शिंदे यांनी छान खेळ केला पण ओवळी संघाला विजयी करू शकले नाहीत.
अंतिम विजयी संघ
कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे दसपटी चिपळूण
अंतिम उपविजयी संघ
ओवळी क्रीडा मंडळ ओवळी दसपटी चिपळूण
उप उपांत्य विजयी संघ
रानसई उचाट खालापुर रायगड
उप उपांत्य विजयी संघ
श्री केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे पनवेल रायगड
सर्वोत्तम खेळाडु :- प्रदीप (बाबु) शिंदे कळकवणे
सर्वोत्तम चढाई :- आत्माराम कदम ओवळी
सर्वोत्तम पक्कड :- विकी उगले रानसई उचाट