सनरायझर्स हैद्राबादने आज आपला नवा कर्णधार म्हणून केन विलीयमसनची नियुक्ती केली आहे. तो आयपीएलच्या ११व्या मोसमात ही जबाबदारी पार पाडेल.
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर काल डेव्हिड वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद सोडले होते तर हे प्रकरण घडले तेव्हा प्रकरणानंतर स्मिथने लगेचच राजस्थान संघाचे कर्णधारपद सोडले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाचे परिणाम क्रिकेट उमटताना दिसू लागले आहेत. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलवरही या प्रकरणाचे पडसाद दिसत आहेत.
या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंना दोषी ठरवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही लगेचच वॉर्नर आणि स्मिथच्या आयपीएल सहभागावरही बंदी घातली आहे.
आयपीएलमध्ये स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचा आणि वॉर्नर सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार होता.
” मी यावर्षी ११व्या मोसमात सनरायझर्स हैद्राबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली आहे. ही प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळण्याची एक मोठी संधी आहे. मी हे आव्हान स्विकारले आहे. ” असे यावेळी केन विलीयमसन म्हणाला.
Kane Williamson has been appointed as captain of SunRisers Hyderabad for IPL 2018. pic.twitter.com/b5SMK8086U
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 29, 2018