भारतात सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये शनिवारी (१७ जानेवारी) बडोदा विरुद्ध महाराष्ट्र संघात सामना पार पडला. या सामन्यात बडोदा संघाने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयात बडोद्याचा प्रभारी कर्णधार केदार देवधरचा मोठा वाटा होता. त्याने अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच एक खास विक्रमही केला आहे.
त्याने या सामन्यात नाबाद ९९ धावांची खेळी केली. त्याने ७१ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ही खेळी साकारली. याबरोबरच त्याने सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला आहे. ही खेळी त्याने ७१ व्या डावात केली आहे. त्यामुळे तो सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत २००० धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आत्तापर्यंत कोणालाही असा पराक्रम करता आला नव्हता.
याबरोबरच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९९ आणि १०० या वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या असणारा तो एकमेव क्रिकेटपटू देखील आहे.
बडोद्याने मिळवला होता विजय –
बडोद्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून केदार व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खेळाडूला ५० धावांचा टप्पा पार करता आला नाही. बडोद्याकडून केदार पाठोपाठ विष्णू सोळंकीने सर्वोच्च २८ धावा केल्या. त्यामुळे बडोदाने निर्धारित २० षटकात ४ बाद १५८ धावा केल्या. महाराष्ट्राकडून तेजिंदर सिंगने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १५९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा डाव १६.५ षटकात सर्वबाद ९८ धावाच करता आल्या. महाराष्ट्राकडून नुशाद शेख(३२), केदार जाधव(२५) आणि तेजिंदर सिंग(११) या तिघांनाच दोनआकडी धावसंख्या उभारता आली. अन्य फलंदाज फार काही खास करु शकले नाही.
सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
२०६६ – केदार देवधर
१९४६ – हरप्रीत सिंग
१९३७ – श्रीवत्स गोस्वामी
१७९८ – पारस डोग्रा
१७५५ – आदित्य तरे
महत्त्वाच्या बातम्या –
एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते ‘हे’ विक्रम; पाहा आकडेवारी
भरतनाट्यम स्टाइलमध्ये गोलंदाजी कधी पाहिलीय का? हा व्हिडिओ जरुर पाहा
सचिन, कूक पाठोपाठ जो रुटनेही नावावर केला ‘तो’ किर्तीमान; मोठ्या-मोठ्या दिग्गजांनाही टाकले मागे