गुवाहटी। खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या दिया चितळे व स्वतिका घोष यांनी १७ वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई केली. त्यांनी आपल्याच सहकारी तनिशा कोटेचा व समृद्धी कुलकर्णी यांचा ११-९, ११-८, ११-८ अशा गेम्सनी पराभव केला.
जिम्नॅस्टिक खेळात महाराष्ट्राने आजही एका पदकाला गवसणी घातली. मुलांच्या १३ वर्षांखालील गटात ओंकार शिंदे याने सर्वसाधारण विभागात ६८.७० गुणांसह रौप्यपदक मिळविले. त्याला उत्तर प्रदेशाच्या गौरव कुमारला गाठता आले नाही. गौरवने निर्विवाद वर्चस्व राखताना ७२.३० गुणांसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्याचाच सहकारी अंकुर शर्मा ६७.५५ गुणांसह ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरली.
ज्युदोमध्ये मुलांच्या १७ वर्षांखालील गटात क्रीडा प्रबोधिनीच्या प्रदीप गायकवाड याने ८१ किलोपेक्षा कमी वजन गटात ब्रॉंझपदक मिळविले. महाराष्ट्राने शनिवारी ज्युडोत दोन ब्रॉंझपदके मिळविली होती.