वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डनं इतिहास रचला आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये 900 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा जगातील केवळ दुसरा खेळाडू बनला. या लिस्टमध्ये त्याच्याच देशाचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. गेलनं 463 टी20 सामन्यांच्या 455 डावांमध्ये 1056 षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर येतो. या 37 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं आतापर्यंत 690 टी20 सामने खेळले, ज्याच्या 614 डावांमध्ये त्यानं 901 षटकार मारले आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू
1056 षटकार – ख्रिस गेल – वेस्ट इंडिज
901 षटकार – किरॉन पोलार्ड – वेस्ट इंडिज
727 षटकार – आंद्रे रसेल – वेस्ट इंडिज
593 षटकार – निकोलस पूरन – वेस्ट इंडिज
550 षटकार – कॉलिन मुनरो – न्यूझीलंड
भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानं 448 टी20 सामन्यांच्या 435 डावांमध्ये 525 षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर विराट कोहलीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर येतं, ज्यानं 399 टी20 सामने खेळताना 382 डावांमध्ये 416 षटकार मारले. हे दोन्ही फलंदाज अजूनही 900 षटकारांच्या विशेष क्लबपासून खूप दूर आहेत.
किरॉन पोलार्ड जगभरातील टी20 लीगमध्ये भाग घेतो. त्यानं 2006 मध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पहिला सामना खेळला होता. तेव्हापासून त्यानं आतापर्यंत 690 सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटनं 614 डावांमध्ये 31.23 च्या सरासरीनं 13429 धावा केल्या. पोलार्डच्या नावावर टी20 मध्ये एक शतक आणि 60 अर्धशतकं आहेत.
हेही वाचा –
संजू सॅमसन चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर? एकदिवसीय कारकिर्दही धोक्यात! बीसीसीआय चौकशी करणार
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाला आणखी एक धक्का, हा खेळाडूही दुखापती
रणजी ट्रॉफीपूर्वी विराट कोहली दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही?