इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या हंगामामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. असे असले तरीही पंजाब संघ कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत कायम राहील. मात्र, काही असे खेळाडू आहेत, ज्यांना पंजाबचा संघ पुढील हंगामात बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
संघाच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “२०२१ च्या हंगामाला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सुरुवात होणार आहे. अशात कर्णधार राहुल आणि प्रशिक्षक कुंबळेला संघ मालक संघात ठेऊ इच्छितात. या हंगामात प्रथमच संघाचे नेतृत्व करणाऱ्या राहुलने फलंदाजीद्वारे चांगली कामगिरी करत 55.83 च्या सरासरीने 670 धावा केल्या, तर कुंबळेचा पंजाबच्या फ्रँचायझीसह पहिला हंगाम होता.”
पंजाबचा संघ कधीच संतुलित संघ नव्हता. परंतु शेवटी त्यांना एक भक्कम आधार मिळाला आहे. ज्याद्वारे तो मजबूत संघ बनू शकतो. या संघात राहुल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस गेलसह रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंचा समावेश आहे. मधल्या फळीत आणि गोलंदाजी विभागातील कमतरता दूर करण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे, जे मागील काही वर्षांपासून अडचणीचे कारण बनले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यावर संघमालक समाधानी आहेत. फलंदाजीसह राहुलची कामगिरी उत्कृष्ट होती आणि हंगामाच्या शेवटी संघाने शानदार पुनरागमन केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जर धाव अपुरी नसती, तर संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला असता.
चांगली गोष्ट म्हणजे त्यांना काही चांगले खेळाडू लाभलेले आहेत. फक्त मधल्या फळीतील उणीवा दूर करण्याची गरज आहे. ज्यात संघाला एक पावर हिटर खेळाडू आवश्यक आहे, तर शमीला जोड म्हणून एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेगवान गोलंदाज देखील संघाला आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मॅक्सवेल आणि कॉट्रेल होऊ शकतात बाहेर
संघाने ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी) आणि शेल्डन कॉट्रेल (5.5 कोटी) यांसारख्या खेळाडूंवर खूप खर्च केला आहे. परंतु दोघांनाही काही खास करता आले नाही. विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅक्सवेल, ज्याने 13 सामन्यांत 15.42 च्या सरासरीने 108 धावा केल्या. 2017 साली मॅक्सवेलला लिलावात मुक्त केल्यानंतर संघाने त्याला पुन्हा संघात घेतले. परंतु त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही आणि त्याच्याबरोबर पुढे खेळणे कठीण होईल. त्याच्या बाबतीत अंतिम निर्णय संघाच्या आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतीनंतर आता धोनी कुक्कुटपालन व्यवसायात; ‘या’ खास कोंबड्यांचा करणार व्यापार
कर्णधाराच्या निर्णयामुळे वैतागला स्टार्क, चक्क बॅटच दिली फेकून, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज