कोलकाता। आज(19 डिसेंबर) आयपीएल 2020 साठी लिलाव सुरु आहे. या लिलावात 48 वर्षीय क्रिकेटपटू प्रविण तांबेवर कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावली असून त्याच्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये मोजले आहेत.
8 ऑक्टोबर 1971 ही प्रविणची जन्मतारिख असून 48 वर्षे 72 दिवस त्याचे सध्याचे वय आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 33 सामने खेळले असून त्यात त्याने 30.46 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
प्रवीण तांबे कोलकाताकडे#म #मराठी #IPLAuction2020 #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT pic.twitter.com/I1l57ypQMc
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
त्याला 2013मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती. 3 वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर 2016 मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर 2017 मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने 10 लाखात संघात सामील करुन घेतले.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने वयाच्या 46 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2 रणजी सामने तर 6 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
आयपीेएलमध्ये 2014 च्या मोसमात त्याने राजस्थानकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याच कोलकाता संघाचा तो या मोसमात सदस्य असणार आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू https://t.co/um610ckWmb#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
आयपीएल २०२०मध्ये दिसणार नाही जहीर खान!
https://t.co/WYM24HuNPD#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019