यशस्वी जयसवाल याच्या 98 धावांच्या तडाख्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा आयपीएल 2023चा 56वा सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयासह राजस्थानने हंगामातील सहावा विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. या सामन्यादरम्यान जयसवालने अवघ्या 13 चेंडूत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. यापूर्वी पहिल्या षटकात केकेआरचा कर्णधार नितीश राणा याच्याविरुद्ध धावांचा पाऊस पाडला. त्याचविषयी सामन्यानंतर राणाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीश राणा याने का टाकले पहिले षटक?
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याचे शतक 2 धावांनी हुकले. त्याने 47 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावा केल्या. त्याने यावेळी 13.1 षटकात संघाला शानदार विजय मिळवून दिलाच, पण त्यासोबत संघाचा नेट रनरेटही (+0.633) चांगला केला. कर्णधार संजू सॅमसन याने यादरम्यान 29 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या.
https://twitter.com/IPL/status/1656712424404455424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656712424404455424%7Ctwgr%5Efd92e01a6ed6ed4408d483759faf0d1116624070%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fkkr-vs-rr-why-nitish-rana-himself-threw-first-over-captain-told-reason-after-getting-26-runs-from-yashasvi-jaiswal%2F233598%2F
या सामन्यात कर्णधार नितीश राणा याने एक हैराण करणारा निर्णय घेतला होता. नेहमी डावाचे पहिले षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज मैदानावर येत असतो. मात्र, यावेळी फिरकी गोलंदाजी करणारा राणा स्वत: आला होता. यावेळी त्याच्या गोलंदाजीवर जयसवाल याने 26 धावा चोपल्या. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात महागडे षटक ठरले. सामना गमावल्यानंतर राणाने यामागी कारण सांगितले.
जयसवालचे कौतुक
दारुण पराभवानंतर नितीश राणा म्हणाला की, “यशस्वी जयसवालचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक क्रिकेटपटूसाठी एक ना एक दिवस नक्की येतो की, जेव्हा तुम्हाला जे करायचे असते, ते होते. आज त्याचा दिवस होता. मी नाणेफेकीदरम्यानही म्हणालो होतो की, ही खेळपट्टी 170-180 धावसंख्येची आहे. आम्ही फलंदाजीत चुका केल्या आहेत. त्याचा परिणाम आम्हाला 2 गुण गमावत मिळाला.”
https://twitter.com/IPL/status/1656713247368818688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656713247368818688%7Ctwgr%5Efd92e01a6ed6ed4408d483759faf0d1116624070%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fkkr-vs-rr-why-nitish-rana-himself-threw-first-over-captain-told-reason-after-getting-26-runs-from-yashasvi-jaiswal%2F233598%2F
पुढे बोलताना राणा म्हणाला की, “मी विचार केला होता की, स्पर्धेत जयसवाल सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. जर त्याला पार्ट टाईम गोलंदाजाद्वारे थोडे चकित केले, तर कदाचित यश मिळू शकते. माझ्याबाबत जग काहीही बोलू शकतं, पण मला याने फरक नाही पडत. ते आमच्या योजनेत होते, पण मला वाटते की, आज त्याचा दिवस होता. त्यामुळे त्याने पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली.”
या विजयासह राजस्थान संघ 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर 16 गुणांसह गुजरात टायटन्स आहे, तर दुसऱ्या स्थानी 15 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स आहे. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (kkr vs rr why nitish rana himself threw first over captain told reason after getting 26 runs from 21 year old yashasvi jaiswal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बाऊंड्री लाईनवर धावत हेटमायरने पकडला अचंबित करणारा कॅच, व्हिडिओ पाहाच
ब्रेकिंग! चहलने रचला इतिहास, ब्रावोच्या विक्रमाला धक्का देत बनला IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर