भारतीय क्रिकेट संघ सध्या युएई येथे टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर पुढील दोन सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. स्कॉटलंडविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केएल राहुल याने त्यानंतर केलेल्या एका ट्विटने आपली मैत्रीण सिनेअभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या सोबतचे आपले नाते सार्वजनिक केले.
राहुलने शेअर केली छायाचित्रे
स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सलामीवीर राहुलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून आपली मैत्रीण व सिनेअभिनेत्री अथिया शेट्टी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने दोघांची दोन सुंदर छायाचित्रे पोस्ट केली. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले,
‘हॅपी बर्थडे माय लव आथिया’ त्यासोबत त्याने हृदयाची इमोजी लावली. त्याला आथियाने ‘माय वर्ल्ड’ अशी इमोजी पाठवत प्रतिक्रिया दिली. यानंतर क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टला पसंती दर्शवित त्यांचे अभिनंदन केले.
अनेक दिवसांपासून होती चर्चा
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी असलेली आथिया अनेक दिवसांपासून राहुलसोबत दिसून येत होती. चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याविषयी संदिग्धता निर्माण झालेली. कारण, या दोघांनी कधीही या नात्याविषयी स्पष्टपणे बोलले नव्हते. मधल्या काळात राहुलचे नाव अभिनेत्री निधी अगरवाल हिच्यासोबत जोडले जात होते. मात्र, त्या दोघांनी पुढे येत आपण चांगले मित्र असल्याचे सांगितलेले.
आथिया दिसली प्रेक्षकात
भारत आणि स्कॉटलंड यांच्यात दुबई येथे झालेल्या सामन्यात आथिया ही प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. या सामन्यात राहुलने १८ चेडूत तुफानी अर्धशतक साजरे केले होते. त्यानंतर आथिया आनंदित झाल्याचे दिसून आलेले. हिरो या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरूवात करणारी आथिया मागील काही काळापासून चित्रपटापासून दूर आहे. आपले वडील सुनील शेट्टी यांचा व्यवसाय ती सांभाळत असल्याचे सांगितले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन विराट झाला भलताच खुश; ‘या’ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
राजामाणूस विराट! पराभूत स्कॉटिश कर्णधाराची पूर्ण केली इच्छा; केले जातेय कौतुक
बड्डे आहे भावाचा! विराटच्या वाढदिवसाचे टीम इंडियाकडून दणक्यात सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ