बंगळूरु। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी 42 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात पंजाबला 17 धावांनी पराभव स्विकारावा लागला. पण पंजाबकडून 42 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलने खास विक्रम केला आहे.
बेंगलोरने दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 42 धावा केल्या आणि पंजाबला चांगली सुरुवात करुन दिली होती. याबरोबरच त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पाही पार केला आहे.
तसेच तो ट्वेटी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावांचा टप्पा पार करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 93 डावात हा टप्पा गाठला आहे. याआधी हा विक्रम सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांच्या नावावर होता. त्यांनी 107 डावात हा टप्पा गाठला होता.
त्याचबरोबर राहुल हा ट्वेटी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने माईक हसीची बरोबरी केली आहे. हसीनेही 93 डावात ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा पार केला केला होता.
ट्वेटी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम हा शॉन मार्शच्या नावावर आहे. त्याने 85 डावात हा पराक्रम केला आहे.
बुधवारी पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना एबी डेविलियर्सने केलेल्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 202 धावा केल्या होत्या. डेविलियर्सने 44 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली.
त्यानंतर 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबला 20 षटकात 7 बाद 185 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 17 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावांचा टप्पा पार करणारे क्रिकेटपटू –
85 डाव – शॉन मार्श
87 डाव – ख्रिस गेल
90 डाव – ऍरॉन फिंच
92 डाव – बाबर आझम
93 डाव – माईक हसी
93 डाव – केएल राहुल
महत्त्वाच्या बातम्या –
–सलग तीन विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बसला सर्वात मोठा धक्का…
–संपूर्ण यादी – असे आहेत २०१९ विश्वचषकासाठी सर्व संघांचे खेळाडू
–२०१९ विश्वचषकासाठी विंडीज संघाची घोषणा, आंद्रे रसलचे झाले पुनरागमन