बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आलेला अनुभवी फलंदाज केएल राहुल याला आधीच सरावासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं होतं. त्याची भारत अ संघात निवड करण्यात आली होती, जेणेकरून तो ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अनधिकृत कसोटी सामन्यात भाग घेऊ शकेल.
सध्या खराब फॉर्मशी झुंजत असलेला राहुल ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दर्जाच्या संघाविरुद्ध मोठी खेळी खेळून आत्मविश्वास संपादन करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राहुलला दोन्ही डावात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात केवळ 10 धावा केल्या.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. टीम इंडियानं झटपट दोन विकेट गमावल्या, मात्र केएल राहुल खेळपट्टीवर उभा होता आज तो कदाचित मोठी खेळी खेळून टीकाकारांना उत्तर देईल, असं सर्वांना वाटत होतं. परंतु झालं उलटच. राहुल 44 चेंडूत अवघ्या 10 धावा करून बाद झाला.
राहुल या डावातही फ्लॉप झाला असला, तर तो अशा पद्धतीनं बाद झाला, ज्यावरून आता चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्याची तुलना चक्क पाकिस्तानच्या बाबर आझमशी केली. वास्तविक, राहुल फिरकीपटूनं लेगस्टंपवर टाकलेला चेंडू सोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या प्रयत्नात तो बोल्ड झाला. चेंडू त्याच्या उजव्या पायाच्या पॅडला लागून स्टंपला लागला. अशाप्रकारे राहुलच्या डावाचा शेवट अत्यंत विचित्र पद्धतीनं झाला, ज्यामुळे चाहते त्याच्यावर तुटून पडले आहेत.
“Don’t know what he was thinking!”
Oops… that’s an astonishing leave by KL Rahul 😱 #AUSAvINDA pic.twitter.com/e4uDPH1dzz
— cricket.com.au (@cricketcomau) November 8, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत केएल राहुल सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीपूर्वी प्लेइंग 11 मधून ड्रॉप करण्यात आलं होतं. नियमित सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध राहणार आहे. त्यामुळे राहुलकडे त्याचा बॅकअप म्हणून पाहिलं जात आहे. मात्र राहुलच्या खराब फॉर्ममुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळू नये, असं अनेक चाहत्याचं मत आहे.
हेही वाचा –
रणजी ट्रॉफी खेळून फायदा काय? 6000 धावा आणि 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही!
दोन खेळाडू आज पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटू जे वनडे पदार्पण सामन्यातच झाले शून्यावर बाद!