उद्यापासून(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
सध्या रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल हे तिघेही सलामीवीर फलंदाज चांगल्या लयीत आहेत. त्याचमुळे उद्याच्या सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात सलामीला रोहित बरोबर शिखर आणि राहुलमधील कोणाला खेळवायचे ही मोठी समस्या संघव्यवस्थापनेसमोर आहे.
पण ही भारतीय संघासाठी चांगली समस्या असल्याचे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले आहे.
याबद्दल राठोड म्हणाले, ‘ही एक चांगली दुविधा आहे. रोहित हा एक स्वाभाविक निश्चित पर्याय आहे. ते दोघेही(शिखर आणि राहुल) चांगले खेळत आहेत. शिखरने वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आणि आणि राहुल चांगल्या लयीत आहे. त्यामुळे आम्ही वेळ आल्यावर यावर निर्णय घेऊ. अजून दोन दिवस आहेत. संघव्यवस्थापन चर्चा करुन याबद्दल निर्णय घेईल.’
त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार आणि सलामीला कोणती जोडी खेळवणार हे पहाणे औत्युक्याचे ठरणार आहे.
शस्त्रक्रियेनंतर विराटने हार्दिक पंड्याला केला होता 'हा' मेसेज
वाचा👉https://t.co/feR6OvXieO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @hardikpandya7 @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
धोनी, द्रविडने दिला होता 'हा' सल्ला, हार्दिक पंड्याने केला मोठा खूलासा
वाचा👉https://t.co/6uih2U6SVN👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @hardikpandya7 @msdhoni #RahulDravid— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020