काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे चौथे जेतेपद मिळवले. यानंतर आता येत्या आयपीएल २०२२ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांची या लीगमध्ये एंट्री झाली आहे. या दोन्ही संघांना विक्रमी बोली लावत खरेदी करण्यात आली आहे. याच धर्तीवर आतापर्यंत आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांची खरी किंमत येथे तुमच्या माहितीसाठी देण्यात आली आहे.
लखनऊ – सोमवारी झालेल्या लिलावात (२५ ऑक्टोबर) संजीव गोयंका यांनी ७०९० कोटींची बोली लावली आणि लखनऊ संघ खरेदी केला. लखनऊ संघ आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. संजीव गोयंका यांनी यापूर्वी देखील रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघ खरेदी केला होता.
अहमदाबाद – आयपीएल २०२२ स्पर्धेत सहभागी होणारा दुसरा संघ म्हणजे अहमदाबाद. सोमवारी (२६ ऑक्टोबर) झालेल्या लिलावात सीव्हीसी कॅपिटलने ५६२५ कोटी रुपयांची बोली लावत हा संघ खरेदी केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स – आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स संघाने चार वेळेस जेतेपद मिळवले आहे. या संघाचे मालक माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन आहेत. त्यांनी २००८ मध्ये हा संघ ९१ मिलियन डॉलर्स म्हणजे ६ अरब ८२ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केला होता.
मुंबई इंडियन्स – मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रिलायन्स कंपनीने २००८ मध्ये हा संघ १११.९ मिलियन म्हणजे ८ अरब ३९ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केला होता.
पंजाब किंग्स – पंजाब किंग्स संघाला डाबर, वाडिया ग्रूप, प्रीती झिंटा आणि एपीजे ग्रूपने एकत्र मिळून खरेदी केला होता. त्यावेळी या संघाची खरेदी किंमत ७६ मिलियन डॉलर म्हणजे ५ अरब ७० कोटी रुपये इतकी होती.
राजस्थान रॉयल्स – राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेचे पहिले जेतेपद मिळवले होते. एमर्जिंग मीडियाने हा संघ ६७ मिलियन डॉलर म्हणजे ५ अरब रुपयांची बोली लावत खरेदी केला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ २००८ पासून आयपीएल स्पर्धेत आहे. या संघाचे मालकी हक्क युनायटेड स्पिरीट्स युनायटेडकडे आहे. सुरुवातीला हा संघ किंगफिशरने ८ अरब ३७ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केला होता.
कोलकाता नाईट रायडर्स – शाहरुख खानच्या रेड चिलीज आणि जय मेहताच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ७५.१ मिलियन डॉलर म्हणजे साडे पाच अरब रुपयांची बोली लावत खरेदी करण्यात आला होता.
दिल्ली कॅपिटल्स – दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालकी हक्क सुरुवातीला जेएमआर ग्रूप कडे होते. परंतु काही वर्षांपूर्वी जेएसडब्ल्यू ग्रूपने या संघाचे ५० टक्के शेअर खरेदी केले होते.दिल्ली कॅपिटल्स संघाची किंमत ६ अरब ३० कोटी रुपये इतकी आहे.
डेक्कन चार्जर्स – डेक्कन चार्जर्स संघाने २००९ ने आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. हा संघ डेक्कन क्रोनिकल संघाने खरेदी केला होता. त्यांनी १०१ मिलियन डॉलर म्हणजे ८ अरब बोली लावत हा संघ खरेदी केला होता.
कोची टस्कर्स केरळ – कोची टस्कर्स केरळ संघाला २०११ मध्ये एकच हंगाम खेळण्याची संधी मिळाली होती. या संघाला कोची क्रिकेट लिमिटेडने खरेदी केले होते. या कंपनीने कोची टस्कर्स केरळ संघ २४ अरब ९९ कोटींची बोली लावत खरेदी केला होता.
सनरायझर्स हैदराबाद – २०१३ पासून डेक्कन चार्जर्स संघाचे मालकी हक्क सन ग्रूप आणि कलानिधी मारनकडे आहे. या दोघांनी मिळून हा संघ ७९.५ मिलियन म्हणजे सहा अरब बोली लावत खरेदी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याचा आला स्कॅन रिपोर्ट, जाणून घ्या किती गंभीर आहे अष्टपैलूची दुखापत?