---Advertisement---

निवृत्तीच्या चर्चांवर कोहलीची थेट प्रतिक्रिया ! एका वाक्यातच दिला मोठा इशारा

---Advertisement---

विराट कोहली भारतीय संघाबरोबरच जगातील सर्वात फिट खेळाडूंच्या यादीत वरच्या स्थानी आहे. विराट कोहली सध्या 36 वर्षांचा आहे, त्याने भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे विश्वकप आणि टी20 विश्वकप स्पर्धा खेळलेल्या आहेत. भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये विजय मिळवल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीच्या खूप चर्चा झाल्या. या गोष्टीवर कोहलीने उत्तर दिलं आहे, विराटने एका कार्यक्रमादरम्यान मोठा इशारा केला आहे.

विराट सध्या आयपीएल 2025 स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघासाठी खेळत आहे. कोहलीने हंगामातील पहिल्या सामन्यात खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करत अर्धशतक झळकावले. कोहलीने यादरम्यानच एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. विराटचा या कार्यक्रमातील एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. यामध्ये एक अँकर कोहलीला विचारते की, तुझ्यासाठी पुढचं मोठं पाऊल काय असणार आहे? तेव्हा विराट म्हणाला, कदाचित विश्व कप 2027 जिंकणं.

विराट कोहलीच्या उत्तराने निवृत्तीच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे, त्याने इशारा करत सांगितले आहे की सध्या निवृत्ती घेण्याचा त्याचा विचार नाही. पुढचा विश्वकप 2027 मध्ये खेळला जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यामध्ये खेळू शकतात. पण ही गोष्ट त्यांच्या फिटनेस आणि फॉर्मवर सुद्धा अवलंबून राहील.

विराट कोहली भारतासाठी आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळलेला आहे. त्याने या दरम्यान 9230 धावा केल्या आहेत. तसेच कसोटी सामन्यांमध्ये 31 अर्धशतक, 30 शतके झळकावली आहेत. त्याने डबल शतक देखील केलेल आहे. विराटने 302 वनडे सामने खेळलेले आहेत यादरम्यान त्याने 14,181 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 51 शतक आणि 74 अर्धशतक केली आहेत. त्याने वनडे 125 सामन्यांमध्ये भारतासाठी 4188 धावा सुद्धा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---