आज (22 डिसेंबर) बाराबती स्टेडियम, कटक (Barabati Stadium, Cuttack) येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात अंतिम आणि निर्णायक वनडे सामना होणार आहे. या मालिकेत दोन्हीही संघांनी 1-1 ची बरोबरी केली आहे.
आजच्या सामन्यात केदार जाधवच्या (Kedar Jadhav) जागी युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी मिळावी, असे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात आशा व्यक्त केली आहे.
“कटकमध्ये भारतीय गोलंदाजांसाठी ही खरी कसोटी असेल. फलंदाजांवर जबाबदारी असेल. प्रथम किंवा दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फारसा फरक पडणार नाही. मला वाटते की जो संघ चांगली फलंदाजी करेल तो संघ ही मालिका जिंकेल,” असे श्रीकांत यांनी लिहिले.
तसेच भारतीय फिरकीपटूंसाठीदेखील ही कसोटी असेल, असेही श्रीकांत यावेळी म्हणाले.11 जणांच्या यादीत केदार जाधवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी मिळावी, असा सल्ला त्यांनी दिला.
“विजयी संघाच्या संयोजनात कोणताही बदल करणे सोपे नाही. परंतु, केदार जाधवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी दिली जावी, असे मला वाटते. 6 व्या क्रमांकावर केदारला फलंदाजीद्वारे काही खास करता आले नाही. चहल आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे विंडीजच्या फलंदाजांसमोर प्रश्न उपस्थित करू शकतात,” असे श्रीकांत यांनी लिहिले.
अंतिम वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; या खेळाडूचे झाले पदार्पण
वाचा👉https://t.co/94KoG4cvBL👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण
वाचा- 👉https://t.co/tD8MkmD1oK👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019