भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंना शनिवारी (16 जानेवारी) पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे कृणालने लगेचच बडोदा संघाचे जैवृ-सुरक्षित वातावरण सोडून घरी धाव घेतली असल्याचेही समजत आहे.
एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारतात सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचा कर्णधार असलेल्या कृणाल पंड्याने त्याला ही दु:खद बातमी समजताच त्याने जैव-सुरक्षित वातावरण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शशीर हट्टंगडी यांनी एएनआयला माहिती दिली की ‘कृणाल पंड्याने जैव-सुरक्षित वातावरण सोडले आहे. त्याच्यावर दु:खद वेळ आली आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन हार्दिक आणि कृणाल यांच्यावर कोसळलेल्या या दु:खाप्रती शोक व्यक्त करत आहे.’
कृणालने चालू सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने उत्तराखंड विरुद्ध 76 धावा त्याने केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली बडोदाने तिन्ही सामने जिंकून एलिट ग्रुुप सी मध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे.
हार्दिक सईद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत सहभागी झालेला नाही. तो सध्या इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या मालिकांसाठी तयारी करत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS v IND : कसोटी मालिकेत चारही सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचा होऊ शकतो ‘असा’ ११ जणांचा संघ
…म्हणून नॅथन लायनला चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने दिला गार्ड ऑफ ऑनर
ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज