---Advertisement---

टीम इंडियाच्या कुलदीप-चहल जोडीच्या प्रदर्शनात बिघाड, यामागचे कारण ‘कॅप्टनकूल’ तर नव्हे! पाहा कसं

Kuldeep Yadav, Yuvendra Chahal And MS Dhoni
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका अंतिम चरणात आली आहे. पहिला वनडे सामना ६६ धावांनी जिंकत भारताने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र इंग्लंडने ६ विकेट्सने दुसरा वनडे सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली. इंग्लंडच्या या विजयात भारतीय फिरकीपटूंचा मोठा हात राहिला. कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांनी या सामन्यात अतियश महागडी गोलंदाजी केली.

तत्पुर्वी झालेल्या टी२० मालिकेत भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल यानेही खूप धावा खर्च केल्या. त्यामुळे कुलदीप-चहलच्या खराब गोलंदाजी प्रदर्शनानंतर भारतीय क्रिकेटरसिक माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याची आठवण काढू लागले आहेत.

धोनीच्या हाती भारताचे नेतृत्त्वपद असताना कुलदीप-चहलची जोडी सुपरहीट होती. त्यांना ‘कुलचा’ (कुल- कुलदीप, चा- चहल) या नावानेही ओळखले जात असे.

धोनी असताना ‘कुलचा’चे दमदार प्रदर्शन

कुलदीपने धोनीसोबत एकूण ४७ वनडे सामने खेळले होते. यादरम्यान त्याने २२.५३ च्या सरासरीने एकूण ९१ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ४.८७ इतका राहिला होता. तर चहलने धोनीसोबत ४६ वनडे सामने खेळताना ८१ विकेट्स चटकावल्या होत्या. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट ४.९२ इतका होता.

धोनी नसताना बिघडले ‘कुलचा’ची कामगिरी

धोनी भारतीय संघातून निवृत्त झाल्यानंतर कुलदीप आणि चहल जोडीची आकडेवारी जास्त खास राहिलेली नाही. कुलदीपने धोनी नसताना एकूण १६ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६.२२ च्या इकोनॉमी रेटने केवळ १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलने धोनीशिवाय ८ वनडे सामने खेळत फक्त ११ विकेट्सची कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ६.८० राहिला आहे.

यावरुन कळते की धोनीच्या उपस्थितीत आणि धोनीच्या अनुपस्थित कुलदीप-चहलच्या प्रदर्शनात खूप फरक दिसून आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कृणाल भारतीय संघाचा पाचवा गोलंदाज असूच शकत नाही; भारतीय दिग्गजाचे मोठे भाष्य

टीम इंडियाला मालिका हॅट्रिकची संधी, तिसऱ्या वनडेत ‘या’ शिलेदारांना उतरवणार सलामीला

पहिल्या २ वनडेत ‘या’ धुरंधरांनी केले दमदार प्रदर्शन, ठरू शकतात ‘मॅन ऑफ द सीरिज’ 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---