भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव एक विशेष विक्रम नोंदवण्याच्या उंबरठयावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात एक विकेट घेताच कुलदीप वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा 22 वा भारतीय गोलंदाज बनेल. कुलदीपने आतापर्यंत 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये 99 विकेट घेतले आहेत.
त्याचबरोबर जर कुलदीपने एक विकेट घेतली तर तो वनडेत सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावावर असून त्याने 56 सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा पार केला होता.
वनडे सामन्यात 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी असून त्याने 58 वनडे सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. या यादीत शमीपाठोपाठ जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 57 सामन्यात 100 वनडे विकट्सचा टप्पा पूर्ण केला होता.
तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात जगातील एकूण गोलंदाजांमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम राशीद खानच्या नावावर आहे. राशीदने 44 सामन्यात 100 वनडे विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
विंडीज विरुद्ध कटकमधील मालिकेचा शेवटचा सामना निर्णायक आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
56 सामने – मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
59 सामने – इरफान पठाण
65 सामने – झहीर खान
67 सामने – अजीत अगरकर
68 सामने – जवागल श्रीनाथ
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज –
44 सामने – राशीद खान
52 सामने – मिशेल स्टार्क
53 सामने – साक्लेन मुश्ताक
54 सामने – शेन बॉन्ड, मुस्तफिजूर रेहमान
55 सामने – ब्रेट ली
56 सामने – ट्रेट बोल्ट, मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण
वाचा- 👉https://t.co/tD8MkmD1oK👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
शिवम दुबे आणि जेसन होल्डरचा हा खास व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहे व्हायरल
वाचा- 👉 https://t.co/oqamvSxXUE👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #shivamdube
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019