यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सुपर -१२ फेरीतील सामन्यांना २३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. अवघ्या ३ दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. चला तर पाहूया कशी अफगानिस्तान विरुद्ध स्कॉटलंड सामना झाल्यानंतर कशी आहे, आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेची स्थिती.
अ गट –
स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसात, अ गटातील ३ सामने खेळले गेले आहेत.या स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाली होती.शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत, दक्षिण आफ्रिका संघावर ५ गडी राखून विजय मिळवला होता. तर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघाने अप्रतिम कामगिरी करत २ वेळेस विश्वविजेते वेस्ट इंडिज संघावर ५ गडी राखून विजय मिळवलेला.
यासह अ गटातील सर्व संघांचे प्रत्येकी १-१ सामने झाले आहेत. या सामन्यानंतर गुणतालिकेत संघ सर्वोच्च स्थानी असून, श्रीलंका संघ दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानी आहे.
ब गट –
टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिल्या ३ दिवसात ब गटातील २ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारत – पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याचा समावेश आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर सोमवारी (२५ ऑक्टोबर) अफगानिस्तान आणि स्कॉटलंड हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने १३० धावांनी विजय मिळवत, गुणतालिकेत सर्वोच्च स्थान गाठले आहे. तर दुसऱ्या स्थानी पाकिस्तान संघ आहे आणि भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. या गटातील पुढील सामना (मंगळवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.