2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला आता एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या 12व्या विश्वचकाची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा विश्वचषक 30 मे ते 14 जुलै 2019 या दरम्यान इंग्लंडमध्ये होत आहे.
जगातील अनेक क्रिकेटपटूंनी विश्वचषकाच्या निमित्ताने क्रिकेट रसिकांना अनेक आठवणी दिल्या आहेत.
त्यामध्ये 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्युझीलंड येथे झालेल्या विश्वचकात सहभागी झालेले काही अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू नसणार आहेत.
त्यामधील अशा खेळाडूंचा आपण आढावा घेणार आहोत, ज्यांना क्रिकेटप्रेमी नक्कीच या विश्वचषकात मिस करतील.
1.एबी डिव्हीलियर्स (दक्षिण अफ्रिका)
ए.बी डिव्हीलियर्सने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनपेक्षितपणे निवृत्ती घेतली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेबरोबर साऱ्या क्रिकेट विश्वालाही धक्का बसला.
क्रिकेट मैदानावरील सुपरमॅन म्हणुन आपली ओळख निर्माण केलेल्या एबीच्या 360 डीग्री फटक्यांचा आनंद आता प्रेक्षकांना घेता येणार नाही.
1995 साली बंदीनंतर पुनरागमण केलेल्या दक्षिण अफ्रिकेने गेल्या दोन दशकात जबरदस्त कामगिरी केली आहे. क्रिकेटला एबीसारखे खेळाडू दिले आहेत. पण दक्षिण अफ्रिकेला आजपर्यंत विश्वचषक जिंकता आला नाही.
2019 विश्वचषकासाठी दक्षिण अफ्रिकन संघात एबीची भूमिका महत्वाची होती. पण त्याच्या अनपेक्षित निवृत्त होण्यामुळे दक्षिण अफ्रिकेची विश्वचषक मोहिम खडतर असणार आहे.
2015 सालच्या विश्वचषकात एबीच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण अफ्रिकेचा निराशाजनक पराभव झाला होता.
ए.बी डिव्हीलियर्स दक्षिण अफ्रिकेकडून 228 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये 53.05 च्या सरासरीने 9577 धावा केल्या आहेत.
2.कुमार संगाकारा (श्रीलंका)
कुमार संगाकारा हा जगातिल सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने श्रीलंकेसाठी 2000 साली पाकिस्तान विरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्याने श्रीलंकेचे चार वेळा ( 2003, 2007, 2011 आणि 2015 ) प्रतिनिधित्व केले होते. त्यामध्ये 2007 साली महेला जयवर्धने तर 2011 ला संगाकाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला होता. दोन्ही वेळी श्रीलंकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सध्याचा श्रीलंकन संघ ज्या अडचणीतून जातोय त्याच्या विचार करता श्रीलंका संघ संगकाराची कमी नक्की जाणवेल.
त्यााचबरोबर त्याच्या डाव्या हाताची क्लासिकल फलंदाजीची आठवण क्रिकेट चाहत्यांना आल्याशिवाय राहणार नाही.
संगाकारा 2015 च्या विश्वचषकात उपांत्य पूर्व फेरीत श्रीलंका दक्षिण अफ्रिकेडून पराभूत झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. हा सामना त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतला शेवटचा सामना ठरला.
संगाकाराने 404 एकदिवसीय सामन्यात 41.99 च्या सरासरीने 14234 धावा केल्या आहेत.
3.ब्रॅन्डन मॅक्कुलम ( न्यूझीलंड )
ब्रॅन्डन मॅक्कुलमच्या नीडर वृत्तीने त्याला स्फोटक फलंदाज म्हणून ओळख मिळवून दिली. त्याने जगातील उत्तोमोत्तम गोलंदाजांना अनेकवेळा लोळावले आहे.
कसोटी क्रिकेट असो टी-20 असो किंवा एकदिवसीय क्रिकेट असो त्याची फलंदाजीची शैली मात्र तीच असायची. त्याची फलंदाजी पहाण्यासाठी क्रिकेट रसिक कायमच आतुर असायचे.
2015 च्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण न्यूझीलंडला विजेतेपद मात्र जिंकता आले नव्हते.
मर्यादित षटकांच्या सामन्यांवर वर्चस्व गाजविणारा मॅक्कुलम कसोटी क्रिकेटमध्येही कमी नव्हता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.
तसेच आयपीलच्या पहिल्याच सामन्यात 2008 साली 158 धावा करत आयपीच्या इतिहासातील पहिला शतकवीर बनला होता.
ब्रॅन्डन मॅक्कुलम 2016 मध्ये सर्व प्रकारच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे त्याच्या फलंदाजीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार नाही.
मॅक्कुलमने 260 एकदिवसीय सामन्यात 30.41 च्या सरासरीने 6083 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात