जगभरातील माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी तयार झाले असून २० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यापैकी बरेच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग होते आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. ते आता लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
या लीगमध्ये भारत, आशिया आणि जागतिक पातळीवरील तीन संघ असणार आहेत. भारतीय संघाला ‘इंडिया महाराजा’ असे नाव देण्यात आले आहे. या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग हे भारतातील दिग्गज खेळाडू दिसणार आहेत. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
सेहवागने यापूर्वी काही वेळा भारतीय संघात प्रभारी कर्णधाराची भूमिका निभावली आहे, तर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पंजाब किंग्स या संघांचे कर्णधारपदसुद्धा भूषवले आहे. इंडिया महाराजा या संघात मोहम्मद कैफला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक जॉन बुकानन हे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
दुसरा संघ एशिया लायन्स हा असणार असून या संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक करणार आहे. या संघात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, उमर गुल, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, चामिंडा वास आणि हबीबुल बशरसारखे खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे. एशिया लायन्सने दिलशानची उपकर्णधारपदी नियुक्ती केली, तर १९९६ चा आयसीसी विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याला प्रशिक्षक पदावर निवडले आहे.
वर्ल्ड जायंट्स हा या स्पर्धेतील तिसरा संघ असून या संघाच्या कर्णधारपदावर वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीला नियुक्त करण्यात आले आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर, इंग्लंडचा केविन पिटरसन यांचा संघात समावेश केला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॉन्टी रोड्स हा वर्ल्ड जायंट्स संघाचा सहाय्यक मार्गदर्शक असणार आहे.
एलएलसी टी२० स्पर्धेचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले, “हे खेळाडू निवृत्त झाले असून त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे. मला खात्री आहे की ते पुढील १० दिवसांत त्यांच्या संघांसाठी त्यांचे अतिरिक्त कौशलय दाखवतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
ICC टी२० ‘टीम ऑफ दी ईयर’ जाहीर! यादी पाहून टीम इंडियाचे चाहते खवळले; एक पण भारतीय कसा नाही?
केएल राहुलच्या हाती वनडे संघाची सुत्रे येताच ३८ वर्षांनंतर पुन्हा घडला इतिहास, वाचा सविस्तर
क्या बात!! भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडेत पंचांनी झळकावलय खास शतक, वाचा सविस्तर