भारतात सध्या आयपीएल 2019 ची स्पर्धा रंगत आहे. या स्पर्धेतील बाद फेरी जवळ येत असल्याने स्पर्धेतील चूरसही वाढायला लागली आहे. परंतू असे असतानात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी आयपीएलच्या प्रत्येक संघातील काही परदेशी खेळाडू आयपीएलचा 12 वा मोसम संपण्यापूर्वीच आपापल्या मायदेशी परतणार आहेत.
यामध्ये इंग्लंडचे खेळाडू सर्वात आधी मायदेशी परतणार आहेत. इंग्लंड आणि सनरायझर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने तर यापूर्वीच आयपीएल 2019 मधील शेवटचा सामना खेळला आहे.
तसेच विश्वचषकासाठी इंग्लंड संघात संधी मिळेलेले मोईन अली, जॉस बटलर, बेन स्टोक्स हे इंग्लंडचे हे खेळाडू देखील 26 एप्रिलपर्यंत मायदेशी परतणार आहेत.
त्याचबरोबर विश्वचषकाच्या सरावासाठी (ट्रेनिंग कॅम्पसाठी) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकासाठी निवड झालेले खेळाडूही आपापल्या मायदेशी परतणार आहेत.
पण अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना मात्र त्यांच्या बोर्डाने संपूर्ण आयपीएल मोसम खेळण्याची परवानगी दिली आहे. तसेच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंबद्दल अजून निर्णय झालेला नाही.
त्यामुळे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंबरोबर अन्य देशांचे खेळाडू ज्यांची विश्वचषकासाठी निवड झालेली नाही आणि जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, तेच खेळाडू संपूर्ण आयपीएल मोसमासाठी उपलब्ध असणार आहेत.
आयपीएल 2019 चा मोसम संपण्यापूर्वीच हे खेळाडू परतणार मायदेशी –
चेन्नई सुपर किंग्स – फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – मोइन अली, मार्कस स्टॉयनिस, हेन्रीच क्लासेन, डेल स्टेन
राजस्थान रॉयल्स – जॉस बटलर, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर
सनरायझर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, शाकिब अल हसन
मुंबई इंडियन्स – जेसन बेऱ्हेंडॉर्फ, क्विंटन डी कॉक
किंग्स इलेव्हन पंजाब – डेव्हिड मिलर
दिल्ली कॅपिटल्स – कागिसो रबाडा
कोलकता नाईट रायडर्स – जो डेन्ली
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: अविश्वसनीय! डिविलियर्सने एका हाताने मारला असा षटकार की चेंडू थेट गेला छतावर
–सगळीकडे शोधलेला चेंडू, अखेर सापडला अंपायरच्याच खिशात, पहा व्हिडिओ
–केएल राहुलचा मोठा पराक्रम; रैना, कोहलीलाही जमले नाही ते करुन दाखवले