पुणे। सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत एलटीआय संघाने हनिवेल संघाचा तर अॅमडॉक्स संघाने विप्रो संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विकास भागवतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एलटीआय संघाने हनिवेल संघाचा1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना शुभम शर्मा व अरमान पटनाईक यांच्या अचूक गोलंदाजीने हनिवेल संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 120 धावांत रोखला. 120 धावांचे लक्ष विकास भागवतच्या 54 व प्रतिक सिंगच्या 27 धावांसह एलटीआय संघाने 18.4 षटकात 9 बाद 121 धावा करून पु्र्ण करत विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. विकास भागवत सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत नविन कटारीयाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने विप्रो संघाचा 46 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. विन कटारीया 24 चेंडूत 44 धावा व 18 धावांत 3 गडी बाद करणारा नविन कटारीया सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
हनिवेल- 20 षटकात सर्वबाद 120 धावा(सुशांत मुधलैर 27(17), मेहबुबली जळगावकर 21(21), निरंजन भोसले 17(17), शुभम शर्मा 4-19, अरमान पटनाईक 2-27, प्रतिक सिंग 1-17) पराभूत वि एलटीआय- 18.4 षटकात 9 बाद 121 धावा(विकास भागवत 54(47), प्रतिक सिंग 27(25), मेहबुबली जळगावकर 3-18, अहमद महोम्मद 3-15, प्रमोद बारवकर 2-25) सामनावीर- विकास भागवत
एलटीआय संघाने 1 गडी राखून सामना जिंकला.
अॅमडॉक्स- 20 षटकात 6 बाद 199 धावा(हर्षद खटावकर 48(41), नविन कटारीया 44(24), आवेश सय्यद 24(9), विशाल हिरगुडे 1-19, शब्बीर सय्यद 1-28, सुशांत सिन्हा 1-27) वि.वि विप्रो- 20 षटकात 7 बाद 153 धावा(विनित वैष्णवी 42(31), रवीकिरण बयाड 33(27), आदित्य वर्मा 3-31, नविन कटारीया 3-18) सामनावीर- नविन कटारीया
अॅमडॉक्स संघाने 46 धावांनी सामना जिंकला.