---Advertisement---

CSK vs LSG: लखनऊ संघाने चेन्नईला जिंकण्यासाठी दिलं 167 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 30 वा सामना आज (14 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि लखनऊ संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनऊने प्रथम फलंदाजी करत सात खेळाडू गमावून 166 धावा केल्या तसेच आता चेन्नईला जिंकण्यासाठी 167 धावांचं‌ आव्हान दिलं आहे.

लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा कर्णधार ऋषभ पंतने केल्या, त्याने 49 चेंडूत 63 धावा करत चार षटकार तसेच चार चौकार झळकावले. त्याचबरोबर लखनऊसाठी मिचेल मार्शने 30 धावा, तसेच आयुष बडोनी 22 धावा आणि अब्दुल समदने 20 धावा केल्या.

चेन्नई साठी गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा आणि तीन षटकात 24 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या तसेच. मथीशा पथीरानाने 2 विकेट्स घेतल्या. खलील अहमद, अंशूल कंबोज यांनी 1- 1 विकेट्स घेतल्या.

चेन्नई हे आव्हान पूर्ण करून हंगामामध्ये दुसरा विजय मिळवेल का? हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---