डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यासाठी महाराष्ट्राने आपली पदकांची घोडदौड कायम ठेवली आहे. स्पर्धेेच्या 6व्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा अर्धशतकाचा पल्ला पार करीत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना 13 सुवर्णांसह 22 रौप्य, 15 कांस्य पदकांची लयलूट केली आहे.
याचबरोबर महाराष्ट्राने 38व्या राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याची कामगिरीही टीम महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून कायम राखली होती. सुवर्णपदकांची संख्या कमी असल्याने शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र तिसर्या स्थानावर होता. (1 फेब्रुवारी) रोजी सकाळच्या सत्रात खोखोमधील 2 व डायव्हिंगमधील ऋतिका श्रीरामच्या पदकामुळे सर्वाधिक 10 पदके जिंकण्याचा करिश्मा महाराष्ट्र संघाने घडवून अव्वल स्थान गाठले होते.
महाराष्ट्राने जलतरणात 5 सायकलिंग मध्ये 1, ट्रायथलॉनमध्ये 2, नेमबाजीत 2, खोखोत 2, स्क्वॉशमध्ये 1, अशी 13 सुवर्णपदके पटकावली आहेत. जलतरणात 5 सुवर्णपदकांसह 20 पदकांची कमाई केली आहे. कबड्डी, वुशु, रग्बी, वेटलिफ्टिंग, योगा खेळातही महाराष्ट्राने पदकांची कामगिरी केली आहे. एक स्पर्धाविक्रमही महाराष्ट्राच्या नावावर आहे. वैष्णव ठाकूर या 23 वर्षीय खेळाडूने 38 वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकाॅर्ड! टी20 क्रिकेटमध्ये 9,000 धावा पूर्ण करत रचला इतिहास
IND vs ENG; अभिषेक शर्माचे झंझावाती शतक, भारताचे इंग्लंडसमोर 248 धावांचे आव्हान
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू