गुवाहाटी । महाराष्ट्र व कर्नाटक संघानी सध्या सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मुलांच्या 21 वर्षाखालील व 17 वर्षाखालील गटात चमक दाखवली तर, गुजरात व केरळ संघांनी 17 वर्षाखालील गटात विजय मिळवले.
मुलांच्या 17 वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघावर 10-4 असा तर, मुलींच्या गटात त्यांना पहिल्या डावात गुजरातविरुद्ध एकही गुण मिळवता आला नाही. पण, महाराष्ट्रच्या मुलीने तिसऱ्या डावात 10 गुणांची कमाई करत सामना चार गुणांनी जिंकला.
मुलींच्या 21 वर्षाखालील गटात महाराष्ट्रच्या मुलींनी आंध्रप्रदेश संघावर विजय मिळवला यामध्ये पहिल्या डावातील 11 गुणांचा समावेश आहे. आंध्रला दुसऱ्या डावात दोन गुण मिळवता आले. त्यामुळे महाराष्ट्रने सामन्यात एक डाव व पाच गुणांनी विजय नोंदवला.
मुलींच्या 21 वर्षाखालील गटात कर्नाटक संघाने हरयाणावर 7-3, तर 17 वर्षाखालील गटात आसामवर एक डाव व 12 गुणांनी विजय नोंदवला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात कर्नाटक व गुजरात संघांनी आंध्रप्रदेशवर विजय मिळवला. मुलांच्या संघाने 7-0 अशी पहिल्या सत्रात आघाडी घेतली.
आंध्र मुलांनी दुसऱ्या सत्रात चमक दाखवली सहा गडी बाद केले1.पण, गुजरातने 10 गुणांनी विजय मिळवला. मुलांच्या 17 वर्षाखालील गटात केरळ संघाने पहिल्या सत्रात आसामचे 18 बचावपटू बाद केले. तर, आसामला दुसऱ्या डावाच्या अखेरीस पाच गुण मिळवता आले. तिसऱ्या डावात आसामला 7 गुणांची भर घालता आली त्यामुळे केरळने एक डाव व 6 गुणांनी विजय मिळवला.
मुलींच्या 17 वर्षाखालील गटात त्यांनी हरियाणावर विजय मिळवला. हरयाणाला अवघ्या एका गुणाने पराभूत व्हावे लागले.