डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅश क्रीडाप्रकारातही महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम राखून सांघिक पुरूष व महिला दोन्ही गटातील संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. रविवारी (2 फेब्रुवारी) दोन्ही संघ तामिळनाडू विरूद्ध सुवर्णपदकासाठी झुंजतील.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्क्वॅशमधील उपांत्य लढतीत पुरूष संघाने सेनादलाचा 2-1 पराभव केला. महिला संघाने उत्तरप्रदेशवर 2-1 ने मात करून अंतिम फेरी गाठली. पुरूषांच्या सेनादल विरूध्द 3 पैकी 2 लढतीत राहुल भाटिया व सुरज चांद यांनी विजय संपादन केले. तामिळनाडूने मध्यप्रदेशला 2-0 हरवून अंतिम फेरी गाठली.
महिलांच्या उपांत्य सामन्यात पहिला सामना महाराष्ट्राने गमविला. उत्तरप्रदेशच्या उन्नती त्रिपाठीने महाराष्ट्राच्या आकांक्षा गुप्तावर 5 सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात केली. दुसर्या व तिसर्या लढतीत महाराष्ट्राच्या सुनीता पटेल व आनिका दुबे यांनी एकतर्फी विजय मिळवीत महाराष्ट्रासाठी अंतिम फेरीचे दार खुले केले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सुपर मॉम’ ऋतिकाची सुवर्णभरारी कायम
आर्या-रुद्राक्ष जोडीचा रूपेरी वेध
आजारपणावर मात करीत साईराजला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य